अ‍ॅपशहर

कोचर यांना हवी संचालकपदी फेरनिवड

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी या समूहाच्या आयसीआयसीआय सेक्युरिटीजच्या संचालक मंडळावर भविष्यातही कार्यरत राहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Maharashtra Times 24 Aug 2018, 4:00 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Chanda-Kochhar


आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी या समूहाच्या आयसीआयसीआय सेक्युरिटीजच्या संचालक मंडळावर भविष्यातही कार्यरत राहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या वादग्रस्त कर्जप्रकरणाच्या चौकशीच्या निमित्ताने कोचर यांना रजेवर धाडण्यात आले आहे. माजी न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांची चौकशी समिती या प्रकरणाचा अंतर्गत तपास करीत आहे.

या बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० ऑगस्टला असून याच सभेअंती त्या निवृत्त होतील. मात्र कंपनी कायद्याच्या १५२व्या कलमानुसार कोचर यांची संचालकपदी फेरनिवड करता येणे शक्य आहे. त्यानुसार कोचर यांनी हा अर्ज केला आहे, अशी माहिती आयसीआयसीआय सेक्युरिटीजच्या २०१७-१८च्या वार्षिक अहवालामध्ये दिली आहे. कोचर या आयसीआयसीआय सेक्युरिटीजच्या प्रमुख आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज