अ‍ॅपशहर

निनाद करपे अध्यक्ष

अॅपटेक लिमिटेडचे संचालक निनाद करपे यांची निवड भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून झाली आहे.

Maharashtra Times 29 Mar 2017, 9:34 pm
मुंबई ः अॅपटेक लिमिटेडचे संचालक निनाद करपे यांची निवड भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून झाली आहे. त्याचवेळी रसना प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष पिरुझ खंबाटा यांची निवड सीआयआयच्या पश्चिम क्षेत्राचे उपाध्यक्ष म्हणून झाली आहे. ही निवड २०१७-१८ या वर्षासाठी आहे. निनाद करपे अॅपटेकमध्ये २००९मध्ये रुजू झाले. देशातील कररचना व परदेशी गुंतवणूक या विषयांवर त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. यापूर्वी सीआयआयमध्ये राज्य कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून करपे यांनी काम पाहिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cii western region chairman ninad karpe
निनाद करपे अध्यक्ष


विक्रम किर्लोस्करांची नेमणूक

चेन्नई ः भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) दक्षिण क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांची नेमणूक केली आहे. यापूर्वी किर्लोस्करांनी सीआयआयच्या विविध समित्यांवर काम केले आहे. २०१६-१७ या वर्षासाठी त्यांची नेमणूक दक्षिण क्षेत्राचे उपाध्यक्ष म्हणून झाली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज