अ‍ॅपशहर

Cylinder Price : महिन्याच्या पहिल्या तारखेला मिळाली गुड न्यूज! LPGच्या दरात झाली कपात

Commercial Lpg Gas Cylinder Price : महिन्याच्या पहिल्या तारखेला नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तेल कंपन्यांनी कपात केली आहे. यामुळे नागरिकांना महाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2023, 12:04 pm
नवी दिल्ली : जूनच्या पहिल्याच तारखेला नागरिकांना महागाईपासून दिलासा देणारी बातमी आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. ही कपात व्यासायिक (कमर्शियल ) सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किमतीत ८३.५० रुपयांनी कपात करण्यात आली. यातून देशातील कोट्यवधी नागरिकांना तेल कंपन्यांनी महागाईपासून काहिसा दिलासा दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम LPG Gas Price
महिन्याच्या पहिल्या तारखेला मिळाली गुड न्यूज! LPGच्या दरात झाली कपात


तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ८३.५० रुपयांनी कमी केली आहे. या निर्णयानुसार नवीन दर आजपासून लागू होतील. पण घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कुठली कपात झालेली नाही.

भारतावर कर्जाचे ओझे, World Bankच्या कर्जावर भरावे लागते व्याज, प्रत्येक नागरिकावर किती भार?
किती आहे १९ किलो व्यासायिक सिलिंडरचा दर

राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीसी सिलिंडरच्या दरात कपात होऊन हे सिलिंडर आता १७७३ रुपयांना मिळेल. तर मुंबईत हे सिलिंडर १७२५ रुपयांना मिळेल. कोलकात्यात १८७५.५० रुपये आणि चेन्नईत १९३७ रुपयांना हे सिलिंडर मिळेल.

​मोदी सरकारची PLI योजना अपयशी... RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उपस्थित केला सवाल
विमान कंपन्यांनाही दिलासा

सरकारी तेल कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच तारखेला विमान कंपन्यांना दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी विमानाच्या इंधन दरात कपात केली आहे. जेट फ्युलच्या दरात ६६३२.२५ रुपके /KL इतकी कपात केली आहे. यावेळी विमान कंपन्यांचा ट्रॅव्हल सिजन जोरात सुरू आहे. अशात इंधन दरात कपात झाल्याने त्यांना फायदा होणार आहे.
लेखकाबद्दल
सचिन फुलपगारे
सचिन फुलपगारे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत, मीडियामध्ये काम करण्याचा १९ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न आणि मुद्द्यांवर काम करण्यात आवड आहे. सतत नवीन शिकण्याची तयारी.... आणखी वाचा

महत्वाचे लेख