अ‍ॅपशहर

अर्थसंकल्पावर राहुल यांचे मौन

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना वित्तीय तुटीवर चिंता व्यक्त केली असून ही तूट भरून कशी काढणार, असा सवालही उपस्थित केला आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र अर्थसंकल्पावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Feb 2018, 4:40 pm
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul-manmohan

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना वित्तीय तुटीवर चिंता व्यक्त केली असून ही तूट भरून कशी काढणार, असा सवालही उपस्थित केला आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र अर्थसंकल्पावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

'हा अर्थसंकल्प राजकीय वा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प आहे, असे मी म्हणणार नाही. मात्र मला खरी चिंता आर्थिक स्थिती कशी सुधारणार याची आहे', असे मनमोहन म्हणाले. 'रिफॉर्म बजेट' या शब्दाचा भरपूर गैरवापर करण्यात आला असून उत्पन्न देणाऱ्या योजना कराच्या कक्षेत आणण्यावर मात्र ठोस असं काहीच करण्यात आलेलं नाही, असे मनमोहन यांनी सांगितले. सरकारने ५० टक्क्यांपेक्षा अधिक हमीभाव देण्याची घोषणा केली आहे. मात्र, यासाठी आर्थिक तरतूद कशी होणार, हा कळीचा प्रश्न आहे, असे मनमोहन म्हणाले.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही वित्तीय समतोल साधण्याच्या परीक्षेत अर्थमंत्री अरुण जेटली नापास ठरल्याची प्रतिक्रिया दिली. वित्तीय तुटीबाबत जो अंदाज जेटली यांनी व्यक्त केला आहे तो चिंताजनक आहे. त्याचा आर्थिक वृद्धीदरावर गंभीर परिणाम होणार आहे, असेही चिदंबरम म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज