अ‍ॅपशहर

सौंदर्याला भुलले, बड्या बातांमध्ये फसले; सुंदरीनं ३० हजार कोटींना गंडवले; घोटाळा करून पसार

सध्या क्रिप्टोकरन्सीची फारशी चर्चा नाही. मात्र गेल्या वर्षी क्रिप्टोची बरीच चर्चा होती. क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवा, क्रिप्टो हेच भविष्य, क्रिप्टोत आताच पैसे गुंतवा, भविष्यात कित्येक पटीनं परतावा मिळेल, क्रिप्टो हीच श्रीमंतीची गुरुकिल्ली, असे शब्द गेल्या वर्षी तुमच्याही कानावर पडले. मात्र मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर क्रिप्टोची चर्चा कमी झाली. काही जण क्रिप्टोत गुंतवणूक करुन कफल्लकही झाले.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2022, 12:48 pm
सध्या क्रिप्टोकरन्सीची फारशी चर्चा नाही. मात्र गेल्या वर्षी क्रिप्टोची बरीच चर्चा होती. क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवा, क्रिप्टो हेच भविष्य, क्रिप्टोत आताच पैसे गुंतवा, भविष्यात कित्येक पटीनं परतावा मिळेल, क्रिप्टो हीच श्रीमंतीची गुरुकिल्ली, असे शब्द गेल्या वर्षी तुमच्याही कानावर पडले. मात्र मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर क्रिप्टोची चर्चा कमी झाली. काही जण क्रिप्टोत गुंतवणूक करुन कफल्लकही झाले. क्रिप्टो चलनाच्या नावाखाली एका तरुणीनं हजारो लोकांना चुना लावला होता. हजारो कोटींचा घोटाळा केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one coin


Ruja Ignatovaनं क्रिप्टोच्या नावाखाली मोठा घोटाळा केला. अनेक जण तिला क्रिप्टो क्वीन म्हणून ओळखतात. रुजा इग्नातोवानं क्रिप्टो करन्सीच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला. अनेकांचे पैसे क्रिप्टोत गुंतवले. रुजाचं ऐकून, तिच्या बोलण्यानं प्रभावित होऊन अनेकांनी पैसे गुंतवले. २०१४ मध्ये पीएचडी झालेल्या रुजानं तिची क्रिप्टोकरन्सी लॉन्च केली. हा काळ क्रिप्टोच्या आरंभाचा होता. अनेक जण या माध्यमातून श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहत होते.
आफताब अनपेक्षित चाल खेळला, पोलीस हैराण; श्रद्धाचा मारेकरी शिक्षेशिवाय सुटणार?
रुजानं वन कॉईन नावाची क्रिप्टो करन्सी लॉन्च केली. अनेक देशांमध्ये क्रिप्टोचा विस्तार केला. लोकांनी वन कॉईन खरेदी करावे यासाठी रुजानं बरेच प्रयत्न केले. रुजाच्या प्रभावी बोलण्यानं अनेकांनी लाखो रुपये गुंतवले. जवळपास २ वर्षे लोकांनी पैसे गुंतवले. वन कॉईन एके दिवशी बिटकॉईनपेक्षा मोठं चलन असेल, असा विश्वास तिनं लोकांना दाखवला. त्यासाठी ती सेमिनार घ्यायची. तिनं अनेक मासिकांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या.

वन कॉईनचं लहान पॅकेज १४० युरोचं, तर सर्वात मोठं पॅकेज १८ हजार युरोचं होतं. भविष्यात एक्स्चेंज उघडण्यात येईल. त्या माध्यमातून वन कॉईन डॉलर किंवा युरो बदलता येईल, अशी स्वप्नं दाखवण्यात आली. या कालावधीत क्रिप्टोतील जाणकारांना वन कॉईनवर संशय आला. त्यांना रुजाकडून अनेक प्रश्नांची उत्तरं हवी होती. या प्रश्नांना उत्तरं देऊ असं सांगत रुजा एकाएकी फरार झाली. तिनं ३० हजार कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा केला.
गोवा फिरून रशियन महिला हॉटेलवर आली, दारू प्यायली; तितक्यात एकानं दार उघडलं अन् नको ते घडलं
वन कॉईन कोणत्याही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित नव्हता. बिटकॉईनसारख्या क्रिप्टो करन्सीज ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. वन कॉईनचं तसं काही नव्हतं. लोकांनी केवळ मार्केटिंग आणि रुजाच्या बोलण्याला भुलून गुंतवणूक केली होती. त्यामुळे अनेकांचं लाखोंचं नुकसान झालं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज