अ‍ॅपशहर

लघु उद्योगांसाठी डिजिटल बँकिंग

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने गुरुवारी लघु व मध्यम उद्योगांसाठी (एसएमई) डिजिटल बँकिंग येथे सुरू केले.

Maharashtra Times 1 Jul 2016, 3:00 am
मुंबई ः खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने गुरुवारी लघु व मध्यम उद्योगांसाठी (एसएमई) डिजिटल बँकिंग येथे सुरू केले. यामुळे एसएमई क्षेत्रातील उद्योजकांना लागणाऱ्या सर्व सेवा ऑनलाइन व अहोरात्र उपलब्ध होणार असल्याचे बँकेच्या व्यवसाय बँकिंग विभागाचे प्रमुख असीम ध्रु यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम digital banking for smes launched
लघु उद्योगांसाठी डिजिटल बँकिंग


एसएमईंना आयात-निर्यातीसाठी बँकांची मदत लागते. पतपुरवठा व पतहमीसाठी लेटर ऑफ क्रेडिट आवश्यक असते, याशिवाय धनादेशाशिवाय पैशांची देवाणघेवाण, बँक हमी, परकी चलन व्यवहार आदींसाठीही एसएमई बँकिंग सेवा उपयुक्त ठरणार आहे. बँकेच्या एकूण व्यवहारांपैकी ६० टक्के व्यवहार ऑनलाइन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच एक लाख एसएमईंपर्यंत ही सेवा नेण्याचे लक्ष्य असल्याचे ध्रु म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज