अ‍ॅपशहर

लाभांशांचे प्रमाण घटणार

एका बाजूला देशातील कंपन्यांचा नफा वाढत असतानाही त्यांच्याकडून गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या लाभांशात मात्र कपात होईल, असा अंदाज आहे.

Maharashtra Times 19 Apr 2017, 3:00 am
मुंबई ः एका बाजूला देशातील कंपन्यांचा नफा वाढत असतानाही त्यांच्याकडून गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या लाभांशात मात्र कपात होईल, असा अंदाज आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात कंपन्यांनी नऊ हजार कोटी रुपये लाभांश दिला होता. चालू आर्थिक वर्षात मात्र या कंपन्या पाच हजार ८०० कोटी रुपये लाभांश डेट स्वरूपात देतील, असे भाकित इंडिया रेटिंग्जने वर्तवले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dividend will low
लाभांशांचे प्रमाण घटणार


इंडिया रेटिंग्जच्या निरीक्षणानुसार, सर्वाधिक लाभांश देणाऱ्या कंपन्या २०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षांत ९० हजार कोटी रुपये लाभांश देतील. यापैकी पाच हजार ८०० कोटी रुपये प्रत्येक वर्षी डेट फंडांच्या स्वरूपात दिला जाईल. कंपन्यांकडून उभारण्यात येणाऱ्या भांडवलात या कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण वाढल्यामुळे कपात झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून डेट योजनांवरील लाभांश घटला आहे. एकूण लाभांशामध्ये डेट लाभांशाचे प्रमाण २००९ ते २०१६ मधील २२ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज