अ‍ॅपशहर

लॉकडाऊन काळात बँकांकडून ५.९५ कोटीचे कर्ज मंजूर

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एक मार्च ते ८ मे या कालावधीत विविध कारणांसाठी म्हणून ५.९५ लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. अर्थ मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 May 2020, 5:57 pm
नवी दिल्ली: देशात करोना व्हायरसमुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (एक मार्च ते ८ मे या कालावधीत) विविध क्षेत्रासाठी ५.९५ लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. अर्थ मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. या काळात नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना १.१८ लाख कोटींचे कर्ज वाटप झाले. ही माहिती देण्याआधी अर्थ मंत्रालयाने म्हटले होते की, लॉकडाऊनच्या काळात मंजूर झालेल्या कर्जावरून देशाची अर्थव्यवस्था रिकव्हरीसाठी तयार झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम loan-money


वाचा- देशात ५० दिवसानंतर तयार होणार पहिली गाडी!

एक मार्च ते ८ मे या कालावधीत छोटे व्यापारी, कृषी, कॉरपोरेट सेक्टर आदींना ५.९५ लाख कोटींचे कर्ज दिले आहे. अर्थ मंत्रालयाकडून याबाबत एक ट्वीट मंगळवारी करण्यात आले. वरील कालावधीत बँकांनी आणीबाणी म्हणून ९७ टक्के ग्राहकांनी कर्जासाठी संपर्क केला.

वाचा- लॉकडाऊनमध्ये असे वाढले डिजिटल पेमेंट!


सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी विशेषत: MSME सेक्टर आणि करोना व्हायरसमुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगांना आधीच क्रेडीट लाइन आणि वर्किंग कॅपिटल सारख्या सुविधा दिल्या आहेत. देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे आणि यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज