अ‍ॅपशहर

चार हजार जणांवर बेकारीची कुऱ्हाड

पैशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे नाईलाजाने बंद कराव्या लागलेल्या ई-कॉमर्स क्षेत्रातील 'आस्कमी' या कंपनीमुळे तिच्या चार हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

Maharashtra Times 22 Aug 2016, 5:19 am
नवी दिल्ली ः पैशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे नाईलाजाने बंद कराव्या लागलेल्या ई-कॉमर्स क्षेत्रातील 'आस्कमी' या कंपनीमुळे तिच्या चार हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आस्कमीची पालक कंपनी असलेल्या गेटिट इन्फोसर्व्हिसेसच्या लेखा पुस्तकांचे परीक्षण करण्यासाठी फोरेन्सिक ऑडिटर नेमला जाईल, असे आस्कमीचा मुख्य गुंतवणूकदार असलेल्या अॅस्ट्रो कंपनीने सांगितले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम e comm co ask me is closed
चार हजार जणांवर बेकारीची कुऱ्हाड


आस्कमीची सध्याची आर्थिक स्थिती पाहता तिच्या दायित्वांमध्ये आणखी वाढ होऊ नये, याची खबरदारी घेण्याची सूचना गेटिट इन्फोसर्व्हिसेसचे मुख्य वित्त अधिकारी आनंद सोनभद्र यांनी अंतर्गत ईमेलद्वारे दिली आहे. आस्कमीची देशात ४० केंद्रे आहेत. या ठिकाणच्या डिलिव्हरी बॉईज व कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज