अ‍ॅपशहर

रोजगाराच्या संधी ई-कॉमर्स, टेक स्टार्टअप्समध्ये

सेवा क्षेत्रामध्ये ऑनलाइन खरेदी-विक्री (ई-कॉमर्स) आणि नवोद्योग (स्टार्टअप्स) यांची नव्याने भर पडली आहे. ई-कॉमर्स आणि तंत्रज्ञान नवोद्योग (टेक स्टार्टअप्स) या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहेत.

Maharashtra Times 12 May 2016, 3:00 am
टीमलीझ एम्प्लॉयमेंट आउटलुक अहवालाचा निष्कर्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम e commerce to create jobs
रोजगाराच्या संधी ई-कॉमर्स, टेक स्टार्टअप्समध्ये


वृत्तसंस्था, नवी दिल्ली सेवा क्षेत्रामध्ये ऑनलाइन खरेदी-विक्री (ई-कॉमर्स) आणि नवोद्योग (स्टार्टअप्स) यांची नव्याने भर पडली आहे. ई-कॉमर्स आणि तंत्रज्ञान नवोद्योग (टेक स्टार्टअप्स) या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये नोकऱ्या शोधू पाहणाऱ्या तरुणांना या दोन्ही क्षेत्रांमध्ये मोट्या संधी असल्याचा निष्कर्ष टीमलीझ संस्थेच्या एम्प्लॉयमेंट आउटलुक अहवालात काढण्यात आला आहे.

वाढत जाणारी क्रयशक्ती, खर्च करण्याची मानसिकता, ब्रँडेड वस्तूंकडे वाढता ओढा तसेच व्यावसायिकांकडून व्यवसाय व बाजारपेठ विस्तारीकरणासाठी चोखाळण्यात येणारे नवनवे मार्ग या सर्वांमुळे ई-कॉमर्स आणि टेक स्टार्टअप्समध्ये नोकऱ्या निर्माण होतील. त्याचवेळी निर्मिती, अभियांत्रिकी व पायाभूत विकास या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधींचा दुष्काळच दिसून येणार आहे. मेक इन इंडिया मोहिमेला म्हणावा तितका वेग येत नसल्यामुळे ही स्थिती ओढवणार असल्याची भीती टीमलीझने व्यक्त केली आहे.

बाजारपेठेशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या विक्री, माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि अन्य ब्लू कॉलर नोकऱ्यांनाही यामुळे फायदा होणार आहे. ई-कॉमर्सचा विस्तार झाल्यास वाहनचालन व मालहाताळणी कौशल्यांचा विकास करून घेतल्यास या दोन्ही क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण होऊ शकतील, असा विश्वास या अहवालात व्यक्त केला गेला आहे.

रोजगाराच्या संधी ई-कॉमर्स व टेक स्टार्टअप्समध्ये निर्माण होणार असल्या तरी त्या मोठ्या प्रमाणावर महानगरांतून व द्वितीय स्तराच्या शहरांतून निर्माण होतील. कोलकाता व अलाहाबाद सोडल्यास अन्य शहरांतून रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. हा अहवाल तयार करताना आठा शहरांतील एफएमसीजी, निर्मिती व अभियांत्रिकी, बीएफएसआय, दूरसंचार, औषधे व आरोग्यनिगा, आयटी, रिटेल, ई-कॉमर्स व टेक स्टार्टअप्स या क्षेत्रांचा आढावा घेण्यात आला.

जॉब मार्केट रोजगाराच्या संधी देण्यासाठी समर्थ बनत आहे. अर्थव्यवस्थेत होणाऱ्या उलाढालीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास आहे. कुणाल सेन, वरिष्ठ उपाध्यक्ष, टीमलीझ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज