अ‍ॅपशहर

हॉटेलिंग, इंटरनेट बुधवारपासून महाग

नवी दिल्ली : हॉटेलिंग, इंटरनेट, मोबाइल सेवा आणि प्रवास बुधवारपासून (१ जून) महागण्याची शक्यता आहे. सध्या असणाऱ्या साडेचौदा टक्क्यांच्या सेवा करात एक जूनपासून अर्धा टक्के कृषी कल्याण उपकराचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पंधरा टक्के दराने सेवाकर द्यावा लागणार आहे.

Maharashtra Times 31 May 2016, 1:40 am
नवी दिल्ली : हॉटेलिंग, इंटरनेट, मोबाइल सेवा आणि प्रवास बुधवारपासून (१ जून) महागण्याची शक्यता आहे. सध्या असणाऱ्या साडेचौदा टक्क्यांच्या सेवा करात एक जूनपासून अर्धा टक्के कृषी कल्याण उपकराचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पंधरा टक्के दराने सेवाकर द्यावा लागणार आहे. म्हणून वरील दोन्ही सेवा महागणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eating out internet to cost more now
हॉटेलिंग, इंटरनेट बुधवारपासून महाग


चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सेवाकरात अर्धा टक्का कृषी कल्याण कराचा अंतर्भाव केला. त्याची अंमलबजावणी एक जूनपासून करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेवाकरात हळूहळू वाढ करून तो १७ ते १८ टक्क्यांवर नेण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. जेणेकरून भविष्यात अंमलात येणाऱ्या ‘जीएसटी’ कराइतकाच तो होईल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोबाइल बिल, हॉटेलिंग, चित्रपट, आरोग्यनिगा (हेल्थकेअर), बँकिंग व्यवहारांवर परिणाम होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज