अ‍ॅपशहर

‘ईपीएफओ’ बैठकीत होणार गुंतवणूक निर्णय

कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाहनिधीचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’मधील (ईपीएफओ) निधी ‘इटीएफ’मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवला जाणार असल्याचे संकेत केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिले. मात्र, या विषयीचा निर्णय ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या ७ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.

Maharashtra Times 27 Jun 2016, 3:00 am
वृत्तसंस्था, हैदराबाद कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाहनिधीचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’मधील (ईपीएफओ) निधी ‘इटीएफ’मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवला जाणार असल्याचे संकेत केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिले. मात्र, या विषयीचा निर्णय ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या ७ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात केंद्रीय अर्थमंत्रालयाने ‘ईपीएफओ’मधील गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला. त्यानुसार विश्वस्त मंडळाला एकूण जमा निधीपैकी किमान ५ टक्के आणि कमाल १५ टक्के रक्कम इक्विटी किंवा इक्विटीसंबंधित फंडामध्ये गुंतवणूक करणे सक्तीचे करण्यात आले आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात ‘ईपीएफओ’ने एकूण निधीच्या पाच टक्के रक्कम अर्थात ६,५७७ कोटी रुपयांची गुंतवणूक ‘इटीएफ’मध्ये केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम epfo meet will decide on investment
‘ईपीएफओ’ बैठकीत होणार गुंतवणूक निर्णय


‘३१ मार्च २०१६पर्यंत गुंतवलेल्या ६,५७७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर ०.३७ टक्क्यांनी ६ हजार ६०१ कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे. ३० एप्रिल २०१६पर्यंत गुंतवलेल्या ६ हजार ६७४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर १.६८ टक्क्यांनी ६,७८६ कोटी रुपयांचा परतावा प्राप्त झाला आहे,’ अशी माहिती दत्तात्रय यांनी दिली. ‘इटीएफ’मध्ये केलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी ७५ टक्के गुंतवणूक राष्ट्रीय शेअर बाजारात, तर उर्वरित २५ टक्के रक्कम मुंबई शेअर बाजारात गुंतवण्यात आली आहे. ऑगस्ट २०१५मध्ये ‘ईपीएफओ’ने प्रथमच शेअर बाजारात गुंतवणूक केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज