अ‍ॅपशहर

EPFO चा धक्कादायक निर्णय ; LIC 'आयपीओ'मध्ये गुंतवणूक करण्याबाबत घेतली ही भूमिका

एलआयसीच्या आयपीओसाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा १३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला. ही ऑफर ३१.६२५ कोटी शेअर्स म्हणजेच ५ टक्के हिस्सा विक्रीसाठी आहे. याचा अर्थ सरकार एलआयसीतील आपली ५ टक्के हिस्सेदारी विकत आहे.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 23 Feb 2022, 2:33 pm
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) मोठा धक्का दिला आहे. ईपीएफओने एलआयसीच्या आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. एलआयसीचा आयपीओ मार्चमध्ये येणार आहे आणि तो आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम epfo will not invest money in lic ipo
EPFO चा धक्कादायक निर्णय ; LIC 'आयपीओ'मध्ये गुंतवणूक करण्याबाबत घेतली ही भूमिका


रशिया-युक्रेन संघर्ष चिघळला; सोन्याच्या किंमतीत तेजी, जाणून घ्या आजचा दर
इक्विटीमध्ये गुंतवणूक सुरूच ठेवणार
ईपीएफओने म्हटले आहे की, वैयक्तिक शेअरमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी ते पारंपरिक गुंतवणूक पद्धतीनुसार एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETFs) द्वारे इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवणार आहेत. एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, सध्याची मार्गदर्शक तत्त्वे आम्हाला एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देत नाहीत. आमच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आयपीओमधील गुंतवणुकीचा समावेश नाही. अशा परिस्थितीत, LIC च्या IPO मध्ये गुंतवणुकीबाबत अंतिम निर्णय फक्त केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT) घेऊ शकते. सीबीटीची बैठक मार्चमध्ये गुवाहाटी येथे होणार आहे.

'स्विगी'ला लागले IPO चे वेध; झोमॅटोला टक्कर देण्यासाठी भांडवल उभारणार
ईपीएफओमध्ये गुंतवणूक करण्याचा पारंपरिक मार्ग
- ईपीएफओ दरवर्षी सुमारे २ लाख कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करते.
- पारंपारिक पद्धतीनुसार, ईपीएफओ एकूण रकमेच्या ४५ ते ५० टक्के रक्कम सरकारी रोख्यांमध्ये गुंतवते.
- ३५ ते ४५ टक्के रक्कम डेट इंस्ट्रूमेंटमध्ये आणि पाच टक्के अल्प मुदतीच्या डेट इंस्ट्रूमेंटमध्ये गुंतवली जाते.
- ५ ते १५ टक्के रक्कम इक्विटी आणि पाच टक्के रक्कम मिश्र गुंतवणूक असेल.
- ऑगस्ट २०१५ ते मार्च २०२१ या कालावधीत ईपीएफओची ईटीएफ (ETF) मध्ये सरासरी गुंतवणूक १,३७,८९६ कोटी रुपये आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष; कच्च्या तेलाचा भाव १०० डॉलरनजीक, हा आहे पेट्रोल-डिझेलचा दर
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (२२ फेब्रुवारी) सांगितले की, ''रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाचा एलआयसीच्या आयपीओवर काहीही परिणाम होणार नाही. बाजारात बरीच हालचाल आहे आणि एलआयसीच्या आयपीओबाबत खूप उत्सुकता आहे. आम्ही असेच पुढे जाणार आहोत. बाजारातील परिस्थिती अनुकूल आहे की नाही, याबद्दल आम्हालाही तितकीच चिंता आहे."

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज