अ‍ॅपशहर

प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ

वृत्तसंस्था, नवी दिल्लीचालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे...

Maharashtra Times 13 Oct 2018, 4:00 am

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत प्रवासी वाहनविक्री ६.८८ टक्क्यांनी वाढली अशी माहिती सियाम या वाहन उत्पादकांची संघटनेने दिली.

या कालावधीत देशभरात १७,४४,३०५ प्रवासी वाहनांची विक्री झाली. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच सहामाहीमध्ये १६ लाख ३२ हजार प्रवासी वाहने विकली गेली होती. खासगी कारच्या विक्रीतही ६.८ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. या सहामाहीमध्ये ११,६९,४९७ कार विकल्या गेल्या. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत १०,९५,०७७ कारची विक्री झाली होती.

कारच्या तुलनेत दुचाकींच्या विक्रीत अधिक म्हणजे १० टक्क्यांची वाढ झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज