मुंबई : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने शेतकऱ्यांची पतगरज पूर्ण करण्यासाठी किसान प्रगती कार्डची (केपीसी) सुविधा सुरू केली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांंना पीक उत्पादन, कापणीपूर्व आणि कापणीनंतरच्या काळात आर्थिक गरज असते. तसेच, शेती मालमत्तेच्या देखभालीसाठीचे भांडवल आणि इतर किरकोळ खर्चाकरिताही निधीची निकड भासते. हे लक्षात घेऊन उज्जीवन बँकेने हे कार्ड सुरू केले आहे. या माध्यमातून वैयक्तिक अपघात विमा योजनेचे लाभही मिळतील. वार्षिक नूतनीकरण पर्यायासह ५ वर्षांच्या मुदतीसाठी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केपीसीद्वारे मिळू शकेल, अशी माहिती या बँकेचे मुख्य व्यवसाय अधिकारी संजय काव यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी किसान प्रगती कार्ड
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने शेतकऱ्यांची पतगरज पूर्ण करण्यासाठी किसान प्रगती कार्डची (केपीसी) सुविधा सुरू केली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Dec 2019, 4:00 am