अ‍ॅपशहर

एनटीपीसीची भांडवल उभारणी

भांडवली खर्चाची तरतूद करण्यासाठी औष्णिक विद्युत क्षेत्रातील सरकारी कंपनी असलेल्या एनटीपीसीने डिबेन्चर्स विक्रीसाठी आणून ८०० कोटी रुपयांची उभारणी केली आहे. मंगळवारी ही उभारणी करण्यात आली. यातून विकल्या गेलेल्या डिबेन्चर्सवर वार्षिक ७.५८ टक्के दराने उत्पन्न देण्यात येणार आहे.

Maharashtra Times 24 Aug 2016, 3:00 am
नवी दिल्ली ः भांडवली खर्चाची तरतूद करण्यासाठी औष्णिक विद्युत क्षेत्रातील सरकारी कंपनी असलेल्या एनटीपीसीने डिबेन्चर्स विक्रीसाठी आणून ८०० कोटी रुपयांची उभारणी केली आहे. मंगळवारी ही उबारणी करण्यात आली. यातून विकल्या गेलेल्या डिबेन्चर्सवर वार्षिक ७.५८ टक्के दराने उत्पन्न देण्यात येणार आहे. हे डिबेन्चर्स १० वर्षे मुदतीचे आहेत. कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांवर होत असलेल्या खर्चासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fast news
एनटीपीसीची भांडवल उभारणी


मण्णपुरमने दिला लाभांश
त्रिचूर ः मण्णपुरम फायनान्स लिमिटेड या खासगी वित्तसंस्थेने आपल्या भागधारकांना दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या भागांसाठी (शेअर्स) ०.५० रुपये अंतरिम लाभांश घोषित केला आहे. या संस्थेला १६०.३४ कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. संस्था देत असलेल्या सुवर्ण कर्जांमध्ये १८.२७ टक्के वाढ झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत सुवर्णकर्जांची व्यवस्थापनांतर्गत मत्ता (एयूएम) ११ हजार ३४५ कोटी रुपये झाली आहे.

चौगुले समूहाची शंभरी
पणजी ः जहाजबांधणीसह कापड, मीठ अशा उद्योगांमध्ये आघाडी घेतलेल्या चौगुले समूहाला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या उद्योगाचा शतक महोत्सव नुकताच गोव्यात साजरा झाला. यावेळी समूहाची वाटचाल सांगणाऱ्या विशेष पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विशेष बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. हा उद्योग आपल्या आजोबांनी स्थापन केल्याचे चौगुले समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय चौगुले यांनी यावेळी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज