अ‍ॅपशहर

मंदी आहे का?.. प्रश्नाला अर्थमंत्र्यांनी टोलवले

देशात भलेही आर्थिक मंदीवर चर्चा होत असली, तरी अर्थमंत्र्यांनी मात्र अशा वृत्तांचा इन्कार केला आहे. रविवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी देशात मंदीच्या वृत्ताचा इन्कार केला. मी येथे उद्योग प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायला आले आहे आणि त्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहे याविषयीच्या सूचना घेण्यासाठी आले आहे, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Sep 2019, 4:29 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nirmala

देशात भलेही आर्थिक मंदीवर चर्चा होत असली, तरी अर्थमंत्र्यांनी मात्र अशा वृत्तांचा इन्कार केला आहे. रविवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी देशात मंदीच्या वृत्ताचा इन्कार केला. मी येथे उद्योग प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायला आले आहे आणि त्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहे याविषयीच्या सूचना घेण्यासाठी आले आहे, असे त्या म्हणाल्या.

भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असं विधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केले. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता सीतारामन यांनी मंदीचा इन्कार केला.

नोकऱ्यांच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, 'बहुतांश नोकऱ्या संघटित क्षेत्रात निर्माण होतात आणि त्यांची आकडेवारी उपलब्ध नाही. बँकांच्या विलीनीकरणानंतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कोणतीही गदा येणार नाही.' अर्थसंकल्पाच्या वेळी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

अर्थव्यवस्थेला आलेल्या मरगळीमुळे ऑटोमोबाइल क्षेत्रात घसरण झाल्याच्या मुद्द्यावर सीतारामन म्हणाल्या की सरकार इलेक्ट्रिक वाहनांना उत्तेजन देणं सुरू ठेवणार आहे, पण अन्य वाहनांची किंमत मोजून नव्हे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अर्थव्यवस्थेतील घसरणीला मोदी सरकारच्या निर्णयांना जबाबदार धरले. याबाबत थेट विचारले असता सीतारामन म्हणाल्या, 'डॉ. मनमोहन सिंह यांनी राजकीय सूड भावनेतून बोलण्याऐवजी सूज्ञ लोकांशी चर्चा करून उपाय शोधायला नको का? असं काही ते म्हणाले आहेत का? यावर मी त्यांची प्रतिक्रिया घेईन. हेच माझं उत्तर आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज