अ‍ॅपशहर

‘फिच’ने घटवला विकासाचा दर, पुढील वर्षात ५.१ टक्क्यांचा अंदाज

'फिच'ने शुक्रवारी जारी केलेल्या 'ग्लोबल इकॉनॉमिक आउटलूक २०२०'मध्ये आगामी काही आठवड्यांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेचे नुकसानही वाढण्याची शक्यता आहे. 'फिच'च्या मते पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने गुंतवणूक आणि निर्यात प्रभावित होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 21 Mar 2020, 5:13 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्था 'फिच रेटिंग'ने आर्थिक वर्ष २०२०-२१साठी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर घटवून ५.१ टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी 'फिच'ने डिसेंबर २०१९मध्ये ५.६ टक्क्यांचा अंदाज वर्तवला होता. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संक्रमण वाढल्याने विकासदराचा अंदाज घटविण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ‘फिच’ने घटवला विकासाचा दर

'फिच'ने शुक्रवारी जारी केलेल्या 'ग्लोबल इकॉनॉमिक आउटलूक २०२०'मध्ये आगामी काही आठवड्यांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेचे नुकसानही वाढण्याची शक्यता आहे. 'फिच'च्या मते पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने गुंतवणूक आणि निर्यात प्रभावित होण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षी ६.४ टक्के वाढीचा अंदाज

'फिच'च्या मते करोना विषाणूमुळे उद्योगधंद्यांवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे देशातील उत्पादक मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून असल्याने 'करोना'मुळे तेथील पुरवठ्यात घट झाली आहे. 'फिच'च्या अंदाजानुसार २०२१-२२मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ६.४ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

येस बँकेमुळे अडचणींत वाढ

'फिच'च्या मते देशातील वित्तीय व्यवस्था कमजोर झाल्याने आगामी काळात अर्थव्यवस्थेत आणखी बिघाड होण्याची शक्यता आहे. येस बँकेच्या प्रकरणामुळे अडचणींमध्ये भर पडली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज