अ‍ॅपशहर

अर्थमंत्री भेटणार बँकांच्या प्रमुखांना

सरकारी बँकांवरील अनुत्पादक कर्जाचे ओझे वाढत असल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १६ सप्टेंबर रोजी सरकारी बँकांच्या प्रमुखांची बैठक आयोजित केली आहे.

Maharashtra Times 23 Aug 2016, 3:00 am
नवी दिल्ली ः सरकारी बँकांवरील अनुत्पादक कर्जाचे ओझे वाढत असल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १६ सप्टेंबर रोजी सरकारी बँकांच्या प्रमुखांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये, जेटली पहिल्या तिमाहीतील बँकांची आणि वित्तीय संस्थांची कामगिरी तपासणार आहेत. तसेच, कर्जवाढ, अनुत्पादक कर्जे याविषयीही बैठकीत चर्चा होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fm to meet bank chiefs
अर्थमंत्री भेटणार बँकांच्या प्रमुखांना


बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कर्जवसुलीत वाढ करण्यासाठी, तसेच सरकारने यासंदर्भात उचलेले कायदेशीर पाऊल याचाही उहापोह केला जाणार आहे. सरकारी बँकांच्या एकूण अनुत्पादक कर्जांमध्ये आर्थिक वर्ष २०१४-१५ मधील ५.४३ टक्क्यांवरून (२.६७ लाख कोटी रुपये) २०१५-१६ मध्ये ९.३२ टक्क्यांपर्यंत (४.७६ लाख कोटी रुपये) वाढ झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज