अ‍ॅपशहर

गव्हर्नर पदासाठी चौघे?

नवी दिल्ली ः रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचा कार्यकाल येत्या ४ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी गव्हर्नरपदासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी, केंद्र सरकारने चौघांची नावे अंतिम यादीत समाविष्ट केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Maharashtra Times 28 Jun 2016, 8:59 am
नवी दिल्ली ः रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचा कार्यकाल येत्या ४ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी गव्हर्नरपदासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी, केंद्र सरकारने चौघांची नावे अंतिम यादीत समाविष्ट केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. उच्चपदस्थ सरकारी कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी गव्हर्नरपदाच्या निवडीसाठी डॉ. राजन मदत करणार असून, ते पतधोरण समितीचे सदस्यपदही स्वीकारण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नावे अंतिम केलेल्यांमध्ये रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण, राकेश मोहन, स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य आणि रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांचा समावेश आहे. आश्चर्य म्हणजे केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांचे नाव यादीत नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज