अ‍ॅपशहर

पेट्रोल दरवाढीने कंबरडे मोडणार

पेट्रोल व ढिझेलच्या दरात गुरुवारी सलग अकराव्या दिवशी वाढ झाल्याने मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचे दर ८५ रुपयांच्या पार पोहोचले.

Maharashtra Times 25 May 2018, 1:00 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Fuel-Hike


पेट्रोल व ढिझेलच्या दरात गुरुवारी सलग अकराव्या दिवशी वाढ झाल्याने मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचे दर ८५ रुपयांच्या पार पोहोचले. सार्वजनिक तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलच्या दरांत ३० पैशांनी तर डिझेलच्या दरांत १९ पैशांनी वाढ केली. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८५.२९वर पोहोचले. मुंबईतील ही सर्वाधिक किंमत ठरली. डिझेलने मुंबईत ७२.९६ची पातळी गाठली. दिल्लीत पेट्रोल ७७.४७ तर, डिझेल ६८.५३ रुपये प्रतिलिटरने उपलब्ध आहे. सततच्या दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. इंधनदरवाढीचा परिणाम म्हणून साहजिकच महागाई वाढणार आहे.

इंधनाच्या दरवाढीवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी दिली होती. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी अर्थ व पेट्रोलियम मंत्रालय एकत्रित विचारविनिमय करीत असल्याचे समजते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज