अ‍ॅपशहर

फंड गुंतवणूकदार वाढले

सामान्य गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांवरील विश्वास वाढतच चालला असून, एप्रिल आणि मे महिन्यात दरमहा ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत १९ लाख खात्यांची भर पडली आहे.

Maharashtra Times 18 Jun 2017, 12:51 pm
नवी दिल्ली ः सामान्य गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांवरील विश्वास वाढतच चालला असून, एप्रिल आणि मे महिन्यात दरमहा ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत १९ लाख खात्यांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण गुंतवणूकदार खात्यांची संख्या ५.७२ कोटींवर पोहोचली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fund investors increased
फंड गुंतवणूकदार वाढले


मागील आर्थिक वर्षांत गुंतवणूकदारांच्या एकूण संख्येत ५९ लाख फोलिओंची भर पडली. एकट्या एप्रिल आणि मे महिन्यात नव्याने १९ लाख गुंतवणूकदार जोडले गेल्याने ही संख्या आता ७७ लाख फोलिओंवर गेली आहे. गेल्या दोन वर्षांत शेअर बाजारानेही चांगलाच वेग पकडल्याने गुंतवणूकदारांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. विशेषतः छोट्या शहरांमधील गुंतवणूकदारांचा कल वाढत असल्याचे दिसून आले आहे.

‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या (अॅम्फी) आकडेवारीनुसार सध्या देशात ४२ मत्ता व्यवस्थापन कंपन्या असून, त्यांच्या माध्यमातून एकूण फोलिओंची संख्या मे २०१७ अखेर ५ कोटी ७१ लाख, ९० हजार ११२वर पोहोचली. मार्च २०१७मध्ये हीच संख्या ५ कोटी ५३लाख ९९ हजार ६३१वर होती. फंड्सइंडिया डॉट कॉमच्या म्युच्युअल फंड रिसर्च विभागाच्या प्रमुख विद्या बाला यांच्या मते हायनेटवर्थ गुंतवणूकदारांनी विविध फंडांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. एकीकडे शेअर बाजार नवनव्या उच्चांकांना स्पर्श करीत असतानाच गुंतवणूकदारही इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम आणि बॅलन्स फंडांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या दोन योजनांमधील खात्यांची संख्या मे अखेर ४.६० कोटींवर पोहोचली आहे. मार्च २०१७अखेर ही संख्या ४.४ कोटींवर होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज