अ‍ॅपशहर

मोदी सरकार दाम्पत्याला देणार ७२ हजार; कसा मिळवाल योजनेचा लाभ? जाणून घ्या

modi governments scheme for married couples: तुमचं लग्न झालं असल्यास सरकारनं तुमच्यासाठी एक महत्त्वाची योजना आणली आहे. विवाहित जोडप्यांना सरकार ७२ हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. मात्र यासाठी विवाहित जोडप्यांना दर महिन्याला २०० रुपये जमा करावे लागतील.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2022, 3:50 pm
मुंबई: तुमचं लग्न झालं असल्यास सरकारनं तुमच्यासाठी एक महत्त्वाची योजना आणली आहे. विवाहित जोडप्यांना सरकार ७२ हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. मात्र यासाठी विवाहित जोडप्यांना दर महिन्याला २०० रुपये जमा करावे लागतील. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन प्लानच्या अंतर्गत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marriage 72
संग्रहित छायाचित्र


कशी कराल नोंदणी? किती गुंतवणूक करायची?
योजनेच्या अंतर्गत नोंदणी करण्यासाठी तुमचं कोणत्याही बँकेत खातं किंवा जनधन खातं असायला हवं. याशिवाय आधार कार्डदेखील असायला हवं. यासाठीची नोंदणी प्रक्रिया केवळ काही मिनिटांची आहे. एखाद्या व्यक्तीचं वय ३० वर्षे असल्यास त्याला या योजनेच्या अंतर्गत १०० रुपये याप्रमाणे वर्षाकाठी १२०० रुपये जमा करावे लागतील. वयाची साठी पूर्ण होईपर्यंत सरकारकडे तुमचे ३६ हजार रुपये जमा झालेले असतील.
घरीबसल्या अॅपद्वारे तुमच्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासा, सोने बनावट असल्यास काय करावे? जाणून घ्या
किती पेन्शन मिळणार?
योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला ३ हजार रुपयांची पेन्शन मिळेल. पती, पत्नीपैकी दुर्दैवानं कोणाला काही झाल्यास नॉमिनी असलेल्या पती किंवा पत्नीला १ हजार ५०० रुपये पेन्श मिळेल. पती, पत्नी दोघेही योजनेचा भाग असल्यास दोघांना मिळून दर महिन्याला ६ हजार रुपये पेन्शन मिळेल. याचा अर्थ दाम्पत्याला वर्षाकाठी ७२ हजार रुपये मिळतील.

तुम्हाला तुमचं भविष्य सुरक्षित करायचं असल्यास केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असायला हवं. गुंतवणूकदारांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळावी या हेतूनं नॅशनल पेन्शन स्कीमची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये हा योजनेमागचा हेतू आहे. निवृत्तीनंतर नागरिक आत्मनिर्भर व्हावेत हा सरकारचा उद्देश आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज