अ‍ॅपशहर

दिलासा ; सोने दरातील घसरण कायम

शेअर बाजारात प्रचंड पडझडीने गुंतवणूकदार पोळले असताना ग्राहकांना मात्र सोने-चांदीने दिलासा दिला आहे. गुरुवारी सोने १२८ रुपयांनी स्वस्त झाले आणि सोन्याचा भाव ४४ हजार ४९० रुपये झाला. चांदी ३०२ रुपयांनी स्वस्त झाली असून चांदीचा भाव किलोला ४६ हजार ८६८ रुपये झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Mar 2020, 6:06 pm
मुंबई : शेअर बाजारात प्रचंड पडझडीने गुंतवणूकदार पोळले असताना ग्राहकांना मात्र सोने-चांदीने दिलासा दिला आहे. गुरुवारी सोने १२८ रुपयांनी स्वस्त झाले आणि सोन्याचा भाव ४४ हजार ४९० रुपये झाला. चांदी ३०२ रुपयांनी स्वस्त झाली असून चांदीचा भाव किलोला ४६ हजार ८६८ रुपये झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gold-new


कमॉडिटी बाजारात (MCX) सोने दरात ५८ रुपयांची घट झाली. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ४३ हजार २९७ रुपयांपर्यंत खाली आला. चांदीच्या किमतीत मात्र वाढ झाली. चांदीचा भाव ६१३ रुपयांनी वधारला आणि ४५३१२ रुपये झाला आहे.

मुंबईत सराफा पेढींवरही सोन्याचा दर दहा ग्रॅमला ४३२०० रुपये होता. त्यात ७७ रुपयांची वाढ झाली. बुधवारी सोने ५१६ रुपयांनी स्वस्त झाले होते. दिल्लीत सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ४४४९० रुपये झाला आहे.

'करोना' आणि मंदीच्या प्रभावाने आंतराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रती औंस १६४५ डॉलर आहे. बुधवारच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत ०.६ टक्क्याची वाढ झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज