अ‍ॅपशहर

गुगलचा निर्धार

लघु व मध्यम उद्योगांमध्ये डिजिटायझेशनबाबत जागृती निर्माण करण्यासाठी गुगल इंडियाने कंबर कसली आहे.

Maharashtra Times 14 Jun 2017, 3:00 am
कोलकाता ः लघु व मध्यम उद्योगांमध्ये डिजिटायझेशनबाबत जागृती निर्माण करण्यासाठी गुगल इंडियाने कंबर कसली आहे. आपल्या डिजिटल अनलॉक्ड कार्यक्रमांतर्गत गुगल इंडिया ४१ दशलक्ष लघु व मध्यम उद्योगांमध्ये डिजिटायझेशनबाबत जागृती निर्माण करणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम google india
गुगलचा निर्धार


सरकारी आकडेवारीनुसार, देशात ५१ दशलक्ष लघु व मध्यम उद्योग आहेत. यापैकी केवळ १० दशलक्ष उद्योगांमध्येच डिजिटायझेशनविषयी जाण आहे. म्हणजेच हेच उद्योजक गुगल सर्च इंजिनवर सापडतात. सर्व उद्योजक डिजिटल मंचावर उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा या उद्योजकांना व्यवसाय विस्तारासाठी होणार आहे. गुगल त्यासाठी प्रशिक्षण देणार आहे. फिक्की या औद्योगिक संघटनेबरोबर गुगल सुमारे पाच हजार ऑफलाइन क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू करणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज