अ‍ॅपशहर

कपड्यांवरील आयात कर वाढला

केंद्र सरकारने वस्त्रोद्योगातील ५० वस्तुंवरील आयात करामध्ये दुपटीने वाढ केली आहे. यामध्ये जॅकेट्स, सूट्स, कारपेट आदींचा समावेश असून या परदेशी वस्तूंवरील आयात कर आता २० टक्के झाला आहे. देशी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Times 18 Jul 2018, 2:00 am
वृत्तसेवा, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम government doubles import duty on textiles
कपड्यांवरील आयात कर वाढला

केंद्र सरकारने वस्त्रोद्योगातील ५० वस्तुंवरील आयात करामध्ये दुपटीने वाढ केली आहे. यामध्ये जॅकेट्स, सूट्स, कारपेट आदींचा समावेश असून या परदेशी वस्तूंवरील आयात कर आता २० टक्के झाला आहे. देशी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे विदेशातून येणारी जॅकेट्स, सूट्स, कारपेट, विणकाम केलेले कपडे, महिलांचे पोषाख, विजारी, लहान मुलांचे कपडे आदी महागणार आहेत. बांगलादेशसारख्या कमी प्रगत देशांतून येणाऱ्या वस्त्रप्रावरणांवरील आयात शुल्क मात्र पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे माफ असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज