अ‍ॅपशहर

HDFCने एफडीवरील व्याजदरात केली मोठी कपात

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेनं मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात मोठी कपात केली आहे. १६ नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू झाले आहेत. त्यानुसार, एचडीएफसी बँकेकडून आता ७ ते १४ दिवस कालावधी असलेल्या मुदत ठेवीवर ३.५० टक्के व्याज देण्यात देईल. तर १५-२९ दिवसांच्या मुदत ठेवीवर ४ टक्के, ३०-४५ दिवसांच्या मुदत ठेवीवर ४.९० टक्के, ४६ दिवस ते सहा महिन्यांच्या मुदत ठेवीवर ५.४० टक्के व्याज देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2019, 4:55 pm
नवी दिल्ली: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेनं मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात मोठी कपात केली आहे. १६ नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू झाले आहेत. त्यानुसार, एचडीएफसी बँकेकडून आता ७ ते १४ दिवस कालावधी असलेल्या मुदत ठेवीवर ३.५० टक्के व्याज देण्यात देईल. तर १५-२९ दिवसांच्या मुदत ठेवीवर ४ टक्के, ३०-४५ दिवसांच्या मुदत ठेवीवर ४.९० टक्के, ४६ दिवस ते सहा महिन्यांच्या मुदत ठेवीवर ५.४० टक्के व्याज देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम HDFC


एचडीएफसी बँकेतील मुदत ठेवींवरील व्याजदर

कालावधीव्याजदर
सात ते १४ दिवस३.५० टक्के
१५ ते २९ दिवस४ टक्के
३० दिवस ते ४५ दिवस ४.९० टक्के
४६ ते ६० दिवस५.४० टक्के
६१ ते ९० दिवस५.४० टक्के
९१ दिवस ते सहा महिने५.४० टक्के
सहा महिने ते नऊ महिने५.८० टक्के
नऊ महिने ते ३६४ दिवस (एका वर्षाला एक दिवस कमी)६.०५ टक्के


एका वर्षासाठी व्याजदर

एचडीएफसी बँकेनं एक वर्षे कालावधी असलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदरात ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. आता ६.३० टक्के व्याज मिळेल. एक वर्षे एक दिवस ते त्यापेक्षा अधिक कालावधी असलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदरातही ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळं आता ठेवीदारांना ६.३० टक्के व्याज मिळेल.

२ वर्षे ते १० वर्षे मुदत ठेवीवर व्याजदर

दोन ते पाच वर्षे कालावधी असलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदरात बँकेनं ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. आता नव्या सुधारित दरानुसार, २ वर्षे १ दिवस ते ३ वर्षे कालावधी असलेल्या एफडीवर ६.४० टक्के व्याज मिळेल. तर तीन वर्षे १ दिवस ते पाच वर्षे कालावधी असलेल्या एफडीवर ६.३० टक्के व्याज मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर

ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य ग्राहकांच्या तुलनेत ०.५० टक्के अधिक व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या मुदत ठेवींवर ४ टक्के ते ६.९० टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.

नागरी बँकांत नाराजी

दरमहा किमान पेन्शन७५०० करण्याची मागणी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज