अ‍ॅपशहर

करोनातून जग या ४ गोष्टी शिकणार : आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा यांनी काळानुसार बदलण्याचं आवाहन केलं आहे. करोनाचं संकट एक दिवस निघून जाईल, पण आपण यातून काही तरी शिकू शकतो, असं ते म्हणाले. घरातून काम करणे, प्रत्यक्ष मीटिंगऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्स असे अनेक पर्याय त्यांनी सुचवले आहेत. जगभरातही अनेक कंपन्यांनी घरातून काम करण्याची मुभा आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Mar 2020, 3:17 pm

करोनाचं मूळ प्राणीजन्य पदार्थांमध्ये: राजेश टोपे

मुंबई : चीनमधून पसरण्यास सुरू झालेल्या करोना व्हायरसने जगभरात दहशत माजवली आहे. भारतातही एकूण २८ रुग्ण आढळून आले आहेत, ज्यातील १६ इटलीचे पर्यटक आहेत. या परिस्थितीतून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो, असं मत उद्योजक आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलं आहे. सध्या आलेलं संकट एक दिवस निघून जाईल, पण यामुळे आपल्याला एक कायमस्वरुपी रिसेट बटण मिळेल, असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anand mahindra


सध्या अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची मुभा देत आहेत. यावर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘या परिस्थितीत आपण काही गोष्टी नक्कीच शिकू. पहिली म्हणजे वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढेल, डिजीटल कॉन्फरन्स वाढतील, मीटिंगच्या ऐवजी व्हिडीओ कॉल्स होतील आणि कमी हवाई वाहतूक होईल, ज्याने प्रदूषण टाळता येईल.’ यासोबतच आपण आणखी काय-काय करू शकतो याबाबतही त्यांनी सोशल मीडियावर विचारणा केली.


जगभरात वर्क फ्रॉम होम;गुगलची आघाडी

गुगलने आयर्लंडची राजधानी डबलिनमधील मुख्यालयात हजारो कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हे मुख्यालय सोमवारी रिकामं दिसून आलं. सोमवारी एका कर्मचाऱ्यामध्ये काही लक्षणं दिसून आली होती. हा करोना व्हायरसच असल्याचं स्पष्ट नव्हतं. पण व्यवस्थापनाने तातडीने पुढील सूचना मिळेपर्यंत वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले.

ट्विटरनेही जगभरातील आपल्या ५ हजार कर्मचाऱ्यांना शक्य तसं घरातूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत. चीनमधून सुरू झालेल्या या व्हायरसने विश्व व्यापलं आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी म्हणून घरातून काम करण्याची मुभा देत आहेत.

भारतात २५ करोनाग्रस्त, आरोग्यमंत्र्याची माहिती

दिल्लीत करोनाचा सामना; प्रशासनाची मेगा तयारी

दिल्लीचे आरोग्य मंत्री संत्येंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सुरक्षित ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर तयारी करण्यात आली आहे. २५ रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत, ज्यात १९ सरकारी आणि ६ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. साडे तीन लाख एन९५ मास्कची सोय करण्यात आली असून करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ८ हजार वेगळ्या किट तयार करण्यात आल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज