अ‍ॅपशहर

निनावी संपत्तीची ४००हून जास्त प्रकरणे उजेडात

आयकर विभागाने ४०० हून अधिक निनावी करारांचा पर्दाफाश केला आहे. आयकर विभागानेच बुधवारी ही माहिती दिली. निनावी मालमत्ता प्रकरणी एकूण २४० हून अधिक प्रकरणांत ६०० कोटी रुपये किंमतीच्या संपत्तीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नव्या कायद्याच्या परिणामकारकतेसाठी मागील आठवड्यात आयकर विभागाने देशभरात २४ निनावी मालमत्ता प्रतिबंधक विभाग स्थापन केले आहेत.

Maharashtra Times 24 May 2017, 10:06 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i t department unearths 400 benami deals attaches properties worth rs 600 crore
निनावी संपत्तीची ४००हून जास्त प्रकरणे उजेडात

आयकर विभागाने ४०० हून अधिक निनावी करारांचा पर्दाफाश केला आहे. आयकर विभागानेच बुधवारी ही माहिती दिली. निनावी मालमत्ता प्रकरणी एकूण २४० हून अधिक प्रकरणांत ६०० कोटी रुपये किंमतीच्या संपत्तीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नव्या कायद्याच्या परिणामकारकतेसाठी मागील आठवड्यात आयकर विभागाने देशभरात २४ निनावी मालमत्ता प्रतिबंधक विभाग स्थापन केले आहेत.

मागील वर्षी १ नोव्हेंबरला या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. निनावी मालमत्ता बाळगणाऱ्याला जास्तीत जास्त सात वर्षांची कोठडी आणि दंडाची तरतूद आहे. आपल्या पैशांतून दुसऱ्यांच्या नावे मालमत्ता खरेदी करणे म्हणजे निनावी मालमत्ता. ती स्थावर, जंगम अशी कोणत्याही प्रकारची असू शकते.

'आयकर तपास संचालनालयाने २३ मे २०१७ पर्यंत ४०० हून अधिक निनावी मालमत्तेची प्रकरणे हाताळली आहेत. बॅंकेतली जमा, जमीन, दागिने आणि फ्लॅट खरेदीची ही प्रकरणे आहेत,' अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज