अ‍ॅपशहर

लाॅकडाउनमध्ये अडकलात; 'ही' कंपनी देतेय घरपोच सेवा

कोव्हीड प्रभावित भागातील, ग्राहकांना सेवा देण्यासाठी भारतातील सर्वांत मोठ्या रेडी-टू-कूक ताज्या अन्नपदार्थांच्या ब्रॅण्डने आपले ‘ट्रस्ट शॉप २.०’ हे बहुप्रशंसित मॉडेल राबवण्यास सुरुवात केली आहे. लाॅकडाउनमुळे घरात अडकलेल्या रहिवाशांना ताजे व आरोग्यपूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी ३५०हून अधिक रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन्सच्या (आरडब्ल्यूए) प्रतिनिधींच्या सहयोगाने हा उपक्रम आयडी ट्रस्ट शॉप राबवत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2020, 3:22 pm
मुंबई : ताज्या अन्नपदार्थांचा भारतातील सर्वांत मोठा ब्रॅण्ड आपल्या बहुप्रशंसित आयडी ट्रस्ट शॉप मॉडेलची अंमलबजावणी मुंबईतील ३५०हून अधिक अपार्टमेंट्समध्ये आणि सुमारे ९,००० घरांमध्ये करत आहे. विशेषत: कोविड प्रभावित भागांत या मॉडेलची अंमलबजावणी केली जात आहे. ‘ट्रस्ट’ माॅडेलवर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्याची वेळ आली आहे, असे या उपक्रमातून दिसून आले आहे. या सेवेमध्ये विक्रेता पेमेंटसाठी न थांबता उत्पादने घरपोच देतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आयडी फ्रेशची वाहने


केंद्र सरकारचा दिलासा ; अल्पबचत व्याजदर 'जैसे थे'
आयडी फ्रेश फूड ज्या ३५०हून अधिक अपार्टमेंट्समध्ये आपल्या उत्पादने ग्राहकांना थेट घरपोच देत आहे. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीची आयडी उत्पादने मिळवण्यासाठी अपार्टमेंट संकुलाबाहेर पाऊल टाकण्याची गरज नाही. अपार्टमेंट संकुलाचे समन्वयक अर्थात फ्रेश फूड बडी आयडीकडे ऑर्डर देतात. २४ ते ४८ तासांत डिलिव्हरी कर्मचारी ही उत्पादने अपार्टमेंट संकुलाजवळ आणून ठेवतात व निघून जातात. ग्राहक ई-वॉलेट्सद्वारेनंतर पैसे चुकते करतात.

मुंबई विमानतळ विकासात घोटाळा ; 'CBI'ची मोठी कारवाई
“आम्हाला मुंबईतील, विशेषत: रेड झोन म्हणून जाहीर झालेल्या भागांतील, अनेक त्रस्त ग्राहकांनी फोन करून सांगितले की, त्यांना अन्नपदार्थ खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. या अनिश्चित काळात रिटेलर्स आणि अन्य व्हेंडर्सही मार्ग काढण्यासाठी संघर्ष करत होते याची आम्हाला जाणीव होती. पुरवठा साखळीत अडथळे होते, शिपिंग्ज विलंबाने होत होती. अशा परिस्थितीत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणेच सर्वोत्तम असा विचार आम्ही केला. विशेषत: किराणा मालाचे दुकान किंवा खरेदी संकुल नसलेल्या भागातील ग्राहकांसाठी हे गरजेचे होते. आम्ही हा सोपा आणि सुलभ उपाय काढला. ग्राहक त्यांनी घेतलेल्या उत्पादनांची किंमत नंतर चुकती करतील असा विश्वास बाळगून डिलिव्हरी सुरू केली,” असे आयडी फ्रेश फूडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक मुश्तफा पी.सी सांगतात.

सध्या आयडी इडली व डोशाच्या तयार पिठासह होल व्हीट परोटा, मलबार परोटा, नॅचरल पनीर आणि फिल्टर कॉफी ही उत्पादने मुंबईत ट्रस्ट शॉपमार्फत पुरवत आहे. अत्यंत अल्प काळात प्रतिसाद मिळाल्यामुळे कंपनीने या उपक्रमाचा विस्तार बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्येही केला आहे. “विश्वास आणि समाजाबद्दल जाण ठेवणे हा आयडीच्या संस्कृतीचा एक मोठा भाग आहे असे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज