अ‍ॅपशहर

आयडीबीआय बँकेच्या तोट्यात वाढ

आयडीबीआय बँकेच्या तोट्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. बँकेने या कालावधीतील आर्थिक निकाल सोमवारी घोषित केले. यानुसार या बँकेने ४,१८५ कोटी रुपयांच्या तोट्याची नोंद केली. गेल्या वर्षी या कालावधीत बँकेला १,५२४ कोटी रुपये तोटा झाला होता.

PTI 5 Feb 2019, 6:52 am
वृत्तसंस्था, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम idbi


आयडीबीआय बँकेच्या तोट्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. बँकेने या कालावधीतील आर्थिक निकाल सोमवारी घोषित केले. यानुसार या बँकेने ४,१८५ कोटी रुपयांच्या तोट्याची नोंद केली. गेल्या वर्षी या कालावधीत बँकेला १,५२४ कोटी रुपये तोटा झाला होता.

बँकेच्या उत्पन्नातही घट झाल्याचे दिसत आहे. या तिमाहीमध्ये बँकेचे उत्पन्न ६,१९० कोटी रुपयांपर्यंत घसरले. गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकेच्या उत्पन्नात ९३५ कोटी रुपयांची घट झाली आहे. एकूण (ग्रॉस) वितरित कर्जांच्या तुलनेत बुडीत कर्जांचे प्रमाण २९.६७ अशा चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. निव्वळ बुडीत कर्जांच्या प्रमाणात मात्र किंचित घट झाली आहे.

हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी बँकेचे समभाग सहा टक्क्यांनी कोसळून ते ५० रुपयांपर्यंत घसरले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज