अ‍ॅपशहर

मोठ्या घसरणीनंतर निर्देशांक सावरला

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये बुधवारी कमालीचा चढउतार अनुभवण्यास मिळाला. सुरुवातीच्या सत्रात तब्बल सातशे अंकांनी निर्देशांक घसरल्याने घसरणीचे सत्र कायम राहील असे वाटत असताना दुपारनंतर निर्देशांकाने दमदार कामगिरी नोंदवली.

PTI 27 Dec 2018, 1:35 am
वृत्तसंस्था, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stock


मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये बुधवारी कमालीचा चढउतार अनुभवण्यास मिळाला. सुरुवातीच्या सत्रात तब्बल सातशे अंकांनी निर्देशांक घसरल्याने घसरणीचे सत्र कायम राहील असे वाटत असताना दुपारनंतर निर्देशांकाने दमदार कामगिरी नोंदवली. निर्देशांक दिवसअखेरीस १८० अंकांनी वधारला व ३५६४९वर स्थिरावला. यामुळे गेल्या तीन सत्रात झालेली निर्देशांकाची पडझड रोखली गेली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानेही ६६ अंकांची कमाई करीत १०७२९चा स्तर गाठला.

मंगळवारी निर्देशांक २७१ अंकांनी घसरला होता. बुधवारी बाजार उघडल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफेखोरीस प्राधान्य दिल्याने निर्देशांक गडगडला. निर्देशांकात सातशे अंकांची घसरण झाल्याने सलग चौथ्या सत्रात बाजार पडणार असे संकेत मिळाले व गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. परंतु दुपारनंतर बँकांच्या समभागांची जोरदार विक्री झाल्याने निर्देशांक सावरत गेला व दिवसअखेरीस त्याने १८० अंकांची कमाई केली. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, कोटक बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रिज, बजाज फायनान्स, आयटीसी या कंपन्यांचे समभाग चांगले वधारले. तर, सन फार्मा, येस बँक, टीसीएस, टाटा मोटर्सच्या समभागांना मात्र फटका बसला.

मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी ५७७ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. तर, देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १८६ कोटी रुपयांचे समभाग विकत घेतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज