अ‍ॅपशहर

Earn Money: फक्त दोन रुपये द्या आणि ५ लाख मिळवा, कसे? वाचा सविस्तर

Earn Money From Home : करोनाचा भीषण काळ पाहिल्यानंतर सध्या सगळेच जण कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याचे मागे आहेत. अशात आम्ही तुम्हाला आज एक पैसे कमावण्याची भन्नाट आयडिया सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात....

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2022, 4:14 pm
Rs 2 Coin Values : जर तुम्हाला काम न करता घरी बसून पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी तुमच्याकडे २ रुपयांचे हे नाणे असणे महत्त्वाचे आहे. हे नाणं असेल तर तुम्ही २ रुपये देऊन ५ लाख रुपये घरबसल्या सहज कमवू शकता. एका नाण्याच्या बदल्यात तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात. पण कसे? वाचा सविस्तर...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coin selling in india


पैसा कोणाला नको असतो. सध्या सगळं काही पैशांसाठी सुरू आहे. अशात प्राचीन वस्तू गोळा करण्यात लोकांसाठी एक विशेष प्रकारचा आनंद असतो. अशा लोकांकडे आधीच पुरातन वस्तूंचा संग्रह आहे. पण त्यांना या संग्रहामध्ये आणखी वाढ करायची असते. तुमच्याकडेही जर प्राचीन नाणी असतील तर त्या बदल्यात तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात.

VIDEO : जेवणाचा घास, बिअर, टेबल, सगळं फेकून मारलं; नवी मुंबईत हॉटेलमधील हाणामारी व्हायरल
तुमच्या पिगी बँक किंवा हँडबॅगमध्ये १९९४, १९९५, १९९७ किंवा २००० चे २ रुपयांचे नाणे असेल तर तुम्हाला लगेच ५ लाख रुपये मिळतील. या नाण्यांना खूप मागणी आहे. ही नाणी मिळवण्यासाठी लोक लाखो रुपये मोजायला तयार होतात. त्याचा फायदा कसा घ्यावा हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

अशा प्रकारे तुम्ही विकू शकता २ रुपयांची नाणी...

- जर तुमच्याकडे २ रुपयांचे नाणे असेल तर तुम्ही ते Quikr Ad प्लॅटफॉर्मवर विकू शकता.

- या वेबसाइटवरील खरेदीदार या दुर्मिळ नाण्यासाठी मोठी किंमत मोजत आहेत.

- २ रुपयांची नाणी विकण्यासाठी, तुम्हाला प्रथम Quikr वर विक्रेता म्हणून साइन अप करावे लागेल.

- यानंतर, तुम्हाला नाण्याच्या इमेजवर क्लिक करून ते अपलोड करावे लागेल.

- त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागेल.

- वेबसाइट तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करेल.

- यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.

तसेच ब्रिटीश राजवटीत व्हिक्टोरिया राणीच्या एक रुपयाच्या चांदीच्या नाण्याची किंमत दोन लाख रुपये होती. त्याचप्रमाणे १९१८ साली बनवलेल्या एक रुपयाच्या ब्रिटिश नाण्याची किंमत ९ लाखांवर गेली आहे. ही नाणी ई-कॉमर्सच्या साइटवर विकली जात आहेत. बाजारात या नाण्यांना खूप मागणी आहे. आता ते विकत घेणार्‍यावर आणि खरेदीदारावर अवलंबून आहे की ते किती किंमतीला ते विकत घेतात.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख