अ‍ॅपशहर

भारताची वैयक्तिक संपत्ती ३९२ लाख कोटींवर

चालू आर्थिक वर्षामध्ये भारतातील वैयक्तिक संपत्तीमध्ये १४.०२ टक्क्यांची वाढ होऊन ती ३९२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचे स्पष्ट झाले आहे...

Maharashtra Times 6 Dec 2022, 11:34 pm
मुंबई : चालू आर्थिक वर्षामध्ये भारतातील वैयक्तिक संपत्तीमध्ये १४.०२ टक्क्यांची वाढ होऊन ती ३९२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वित्तीय संपत्तीमधील १७.४२ टक्के व भौतिक संपत्तीमधील ९.२४ वाढीमुळे वैयक्तिक संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. आघाडीचा वित्तीय सेवा समूह असणाऱ्या कार्वी प्रायव्हेट हेल्थच्या 'इंडिया वेल्थ रिपोर्ट २०१८'मध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम money


आर्थिक गुंतवणुकीत डायरेक्ट इक्विटीने आघाडीचे स्थान पटकावत मुदत ठेवींना मागे टाकले. तर, म्युच्युअल फंड व पर्यायी गुंतवणूक या प्रकारांतही चांगली वाढ झाली. 'जगातील सर्वांत वेगाने वाढणारी विकसनशील अर्थव्यवस्था'हा दर्जा भारताने पुन्हा चीनकडून हस्तगत केला आहे. येत्या पाच ते सात वर्षांमध्ये इक्विटी या गुंतवणूक प्रकाराचे महत्त्व कमालीचे वाढणार आहे आणि गुंतवणूकदार त्यांची संपत्ती प्रामुख्याने इक्विटीजमध्ये ठेवतील.", असे निरीक्षण कार्वीचे सीईओ अभिजित भावे यांनी नोंदवले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज