अ‍ॅपशहर

कारखानदारी संकटात; 'करोना'चा उत्पादनाला जबर फटका

गेल्यावर्षी एप्रिल ते जून या काळात आयआयपी ३ टक्क्यांनी विस्तारला होता. वापरावर आधारित आयआयपीचा विचार केल्यास यंत्रसामग्रीच्या उत्पादनात ३६.९ टक्के घट झाली आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीत ३५.५ टक्के घसरण दिसून आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2020, 10:37 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : गेले महिने सातत्याने घसरत असलेले औद्योगिक उत्पादन जून महिन्यांतही १६.६ टक्के घसरले आहे. करोना साथीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा परिणाम कारखानदारीवरही दिसून येत आहे. ही माहिती केंद्र सरकारने मंगळवारी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम औद्योगिक उत्पादन १६ टक्के घसरले
IIP


कारखान्यांतील किंवा औद्योगिक उत्पादनातील ही घसरण सर्वच औद्योगिक क्षेत्रांत झाली आहे. कारखानदारी (मॅन्युफॅक्चरिंग), खनिकर्म, ऊर्जा निर्माण, यंत्रसामग्री आणि ग्राहकोपयोगी वस्तू या सर्वच क्षेत्रांतील उत्पादन कमी झाल्याचे केंद्रीय सांख्यिकी व उपक्रम मंत्रालयाने म्हटले आहे.

यावर्षी लाल किल्ल्यावरुन देशाला हे मोठं गिफ्ट मिळणार?
औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) जून २०१९ मध्ये १.३ टक्के विस्तारला होता. एप्रिल महिन्यात आयआयपी ५३.६ होता, जो मे महिन्यात ८९.५ झाला, तर जूनमध्ये तो १०७.८ झाला.

सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार कारखानदारी क्षेत्रातील उत्पादन १७.१ टक्के आक्रसले आहे, ऊर्जा व खाणकाम या क्षेत्रांतील उत्पादन अनुक्रमे १० व १९.८ टक्के कमी झाले आहे. करोनापूर्व आयआयपी आणि करोनापश्चात आयआयपी यांची तुलना करू नये असेही केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने सांगितले आहे.

सोने-चांदी गडगडले ; सलग दुसऱ्या दिवशी बाजारात मोठी घसरण
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत आयआयपी ३५.९ टक्के घसरला आहे. करोना साथीच्या प्रभावामुळे सर्वच औद्योगिक क्षेत्रांची पीछेहाट झाली आहे. संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत कराव्या लागलेल्या लॉकडाउनमुळे बाजारांतील उलाढालींवर परिणाम दिसून आला होता. त्यामुळे तयार मालाच्या मागणीवर परिणाम झाला आणि नवीन मालाच्या ऑर्डर्स रद्द झाल्या. यामुळेही औद्योगिक उत्पादन थंडावले.

एप्रिल ते जूनमधील आकडेवारी
क्षेत्रघसरण (टक्के)
यंत्रसामग्री ६४.३
ग्राहकोपयोगी वस्तू६७.६
ग्राहकोपयोगी नाशवंत वस्तू१५.३

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज