अ‍ॅपशहर

LICची बचत प्लस योजना, सुरक्षेसह बचतही; जाणून घ्या सर्वकाही

जर तुम्हाला एलआयसी बचत प्लस योजनेच्या हप्त्यांमध्ये प्रीमियम भरायचा असेल, तर मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम जमा केला जाऊ शकतो.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2021, 3:56 pm
मुंबई : भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ही देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी आहे. सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून ते सुरक्षा आणि बचतीच्या विविध योजना आणते. आताही एलआयसीने बचत प्लस प्लॅन योजना आणली असून त्यात मूळ विमा रक्कम १ लाख रुपये आहे. जास्तीत जास्त विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही एकरकमी प्रीमियमदेखील भरू शकता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम एलआयसी


जर तुम्हाला हप्त्यांमध्ये प्रीमियम भरायचा असेल, तर प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक अशा प्रकारे जमा करता येतो. कोणत्याही एजंटशिवाय जर तुम्ही पॉलिसी ऑनलाईन घेतली, तर तुम्हाला सूट देखील मिळेल.

काय आहेत फायदे
- एलआयसीच्या या योजनेची परिपक्वता (मॅच्युरीटी) १८ वर्षे आहे. जोखीम सुरू होण्याच्या तारखेपूर्वी जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर प्रीमियम व्याजाशिवाय परत केला जाईल. यामध्ये कर, अतिरिक्त शुल्क आणि राइडर प्रीमियम समाविष्ट होणार नाही.
- जोखीम सुरू झाल्याच्या तारखेनंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम सदर पॉलिसीधारकाच्या नामनिर्देशित व्यक्तीकडे दिली जाईल.

मॅच्युरिटी बेनिफिट (एलआयसी बचत प्लस प्लॅन फायदे)
पॉलिसीच्या परिपक्वतेनंतर (मॅच्युरिटी) पॉलिसीधारकाला मॅच्युरिटीची रक्कम दिली जाईल. पॉलिसीधारक एकतर परिपक्वता लाभ मिळवू शकतो किंवा ५, १० किंवा १५ वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये मिळवू शकतो. त्याचप्रमाणे, मृत्यू लाभ ५, १० किंवा १५ वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये किंवा एकरकमी मिळवू शकतो.

इतर वैशिष्ट्ये
सिंगल प्रीमियम पेमेंटच्या बाबतीत पॉलिसी मॅच्युरिटी कधीही सरेंडर केली जाऊ शकते. जर तुम्ही पहिल्या वर्षी पॉलिसी सरेंडर करत असाल, तर तुम्हाला सिंगल प्रीमियमच्या ७५ टक्के रक्कम मिळेल. मर्यादित (लिमिटेड प्रीमियम पेमेंट ऑप्शन) विकल्पांमध्ये किमान २ वर्ष प्रीमियम भरल्यानंतर सरेंडर करता येते.

तुम्ही एलआयसी बचत प्लस योजनेतही कर्ज घेऊ शकता. जर पॉलिसीधारक पॉलिसीवर समाधानी नसेल, तर ऑफलाइन पॉलिसीच्या बाबतीत ते घेतल्याच्या १५ दिवसांच्या आत परत करता येईल. तर ऑनलाइन घेतले असल्यास ते ३० दिवसांच्या आत केले जाऊ शकते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज