अ‍ॅपशहर

लखपतींच्या संख्येत ‘जीएसटी’नंतर वाढ!

वस्तू आणि सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी झाल्यानंतर डॉलरमध्ये उत्पन्न असणाऱ्या लखपतींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ २० टक्क्यांपर्यंत असल्याचे दिसून आले आहे. या शिवाय आर्थिक वर्ष २०१७मध्ये त्यांच्या संपत्तीतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Maharashtra Times 21 Jun 2018, 1:00 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gst1


वस्तू आणि सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी झाल्यानंतर डॉलरमध्ये उत्पन्न असणाऱ्या लखपतींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ २० टक्क्यांपर्यंत असल्याचे दिसून आले आहे. या शिवाय आर्थिक वर्ष २०१७मध्ये त्यांच्या संपत्तीतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

फ्रेंच टेक कंपनी 'केपजेमिनी'च्या एका अहवालानुसार भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. या अहवालानुसार देशातील 'हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल'ची (एचएनआय) संख्या आणि त्यांची संपत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबतीत देशाचा दर जागतिक सरासरीपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. चीन, अमेरिका, जर्मनी आणि जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर 'एचएनआय'ची संख्या वाढत आहे. २०१७मध्ये भारत याबाबतीत अकराव्या स्थानी असल्याचे आढळून आले. मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये झालेल्या ५० टक्के वृद्धीमुळे देशाचा विकास दर घटल्याचे दिसून आले आहे. याशिवाय रिअॅलिटीच्या किमतीत ४.८ टक्के आणि जीडीपीमध्ये ६.७ टक्क्यांची झालेली वाढ हे देखील यामागील प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी एक जुलैला 'जीएसटी' लागू झाला. 'जीएसटी' लागू झाल्यानंतर लखपतींच्या संपत्तीवर विपरित परिणाम झाला होता. मात्र, हा परिणाम तात्पुरता असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यंदा जानेवारीत सादर झालेल्या एका अहवालानुसार देशातील १२० कोटी लोकसंख्येपैकी एक टक्का लोकांकडे ७३ टक्के संपत्तीचा साठा आहे. या शिवाय 'ऑक्सफॅम'च्या अहवालानुसार ६७ कोटी भारतीय ज्यांच्यामध्ये गरीबांचाही समावेश आहे, त्यांच्याकडील संपत्तीत केवळ एक टक्का वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज