अ‍ॅपशहर

मिस्त्रींची याचिका फेटाळली

टाटा सन्सविरोधात राष्ट्रीय कंपनी लवादाकडे सायरस मिस्त्री यांनी दाखल केलेली याचिका बुधवारी लवादाने फेटाळून लावली.

Maharashtra Times 19 Jan 2017, 3:00 am
मुंबई : टाटा सन्सविरोधात राष्ट्रीय कंपनी लवादाकडे सायरस मिस्त्री यांनी दाखल केलेली याचिका बुधवारी लवादाने फेटाळून लावली. मिस्त्री यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कॉर्पोरेट गाऱ्हाणी सोडवण्यासाठी राष्ट्रीय कंपनी लवाद ही न्यायालयसदृश यंत्रणा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mistry
मिस्त्रींची याचिका फेटाळली


मिस्त्री यांना समूहाच्या अध्यक्षपदावरून ऑक्टोबर २०१६मध्ये दूर केले तरीही ते समूहाच्या संचालक मंडळावर अद्याप कार्यरत आहेत. टाटा सन्सने ६ फेब्रुवारी रोजी टाटा समूहाच्या संचालक मंडळातून सायरस मिस्त्री यांची गच्छंती करण्यासाठी अतिविशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) बोलावली आहे. टाटा समूहाच्या संचालक मंडळावरून आपली हकालपट्टी केली जाऊ नये, यासाठी सायरस मिस्त्री यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रीय कंपनी लवादाकडे याचिका दाखल केली होती. राष्ट्रीय कंपनी लवादाकडे यापूर्वीच मिस्त्री यांना पदच्युत केल्याप्रकरणी तसेच अल्प भागधारकांच्या हक्कांवर गदा आणल्याप्रकरणी याचिका दाखल झाल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज