अ‍ॅपशहर

नोटाबंदीच्या दिवसांत किती जमा केले? सांगा!

नोटाबंदीनंतरच्या दिवसांत तुम्ही बँकेमध्ये किती रक्कम जमा केलीय, आठवतंय का? नसेल तर लगेच पासबुक तपासा! कारण, या दिवसांत तुम्ही तुमच्या बँक खात्यावर किती पैसे जमा केले याचा तपशील इन्कम टॅक्स रिटर्न भरताना द्यावा लागणार आहे.

Maharashtra Times 31 Mar 2017, 11:12 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new itr forms to seek details on cash deposits during demonetisation
नोटाबंदीच्या दिवसांत किती जमा केले? सांगा!


नोटाबंदीनंतरच्या दिवसांत तुम्ही बँकेमध्ये किती रक्कम जमा केलीय, आठवतंय का? नसेल तर लगेच पासबुक तपासा! कारण, या दिवसांत तुम्ही तुमच्या बँक खात्यावर किती पैसे जमा केले याचा तपशील इन्कम टॅक्स रिटर्न भरताना द्यावा लागणार आहे.

आयकर विभागानं २०१७-१८ या वर्षासाठी नवा इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फॉर्म जारी केला आहे. त्यामध्ये गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या नोटाबंदीच्या दिवसांत करदात्यांनी किती पैसे बँक खात्यावर जमा केले, याची माहिती घेण्यासाठी एक स्वतंत्र रकाना देण्यात आला आहे. हा रकाना पगारदारांसाठी असलेल्या 'सहज' फॉर्ममध्येही असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अघोषित असलेल्या व तरीही बँकेत जमा करण्यात आलेल्या उत्पन्नाचा तपशील जाहीर करण्यासाठी नोटाबंदीच्या दिवसांत सरकारनं 'ऑपरेशन क्लीन मनी' व पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत करदात्यांना संधी दिली होती. आता, इन्कम टॅक्स रिटर्नच्या माध्यमातूनच डिपॉझिटचा आकडा जाणून घेतला जाणार आहे.

नोटाबंदीच्या काळात नेमकी किती रक्कम बँकेत जमा झाली हे जाणून घेण्याचा उद्देश यामागं आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. यावेळच्या आयटीआर फॉर्ममध्ये आधार क्रमांकासाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात आला आहे. मागील वर्षी आधार क्रमांक देणं ऐच्छिक होतं. मात्र, आता ते सक्तीचं करण्यात आलं आहे. आधारच्या मदतीनं आयटीआरची ऑनलाइन पडताळणी करता येईल,' असं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज