अ‍ॅपशहर

नीरव मोदीप्रकरणी हाँगकाँगला साकडे

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटी रुपयांचा कर्जघोटाळा करून परदेशी पलायन केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याची मालमत्ता जप्त करण्यासाठी या बँकेने हाँगकाँग न्यायालयाला साकडे घातले आहे. नीरव मोदी व या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांच्या जगभरातील देशात जिथे मालमत्ता आहेत तेथील प्रशासनाला व अन्य प्राधिकरणांना या मालमत्तांच्या जप्तीसाठी विनंती करण्याचा निर्णय पंजाब नॅशनल बँकेने घेतला आहे.

Maharashtra Times 23 Apr 2018, 5:00 am

ईटी वृत्त, नवी दिल्ली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम nirav-modi


पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटी रुपयांचा कर्जघोटाळा करून परदेशी पलायन केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याची मालमत्ता जप्त करण्यासाठी या बँकेने हाँगकाँग न्यायालयाला साकडे घातले आहे.

नीरव मोदी व या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांच्या जगभरातील देशात जिथे मालमत्ता आहेत तेथील प्रशासनाला व अन्य प्राधिकरणांना या मालमत्तांच्या जप्तीसाठी विनंती करण्याचा निर्णय पंजाब नॅशनल बँकेने घेतला आहे. यानुसार पंजाब बँकेने यापूर्वीच अमेरिकेतील इनसॉल्व्हन्सी अॅथॉरिटीशी संपर्क साधला आहे. यानंतर या बँकेने हाँगकाँगमधील न्यायालयात नीरवच्या मालमत्ता वसुलीसाठी याचिका केली आहे, अशी माहिती या बँकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. नीरव मोदी हा सध्या हाँगकाँगमध्येच असून तेथे त्यांची मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आहे. नीरव मोदीला अटक करण्यात यावी अशी विनंती केंद्र सरकारनेही हाँगकाँगला यापूर्वीच केली आहे. नीरवच्या अटकेप्रकरणी निर्णय घेण्यास हाँगकाँग स्वतंत्र आहे, असे सांगत चीननेही भूमिका स्पष्ट केली आहे.

अमेरिकेतही मालमत्ता

नीरव मोदीची अमेरिकेतही गडगंज संपत्ती आहे. फायरस्टार डायमंड्स या नावाने त्याचे तेथे एक हिरे दालन आहे. या दालनाच्या दिवाळखोरीची प्रक्रिया तेथे सध्या सुरू असून यात पंजाब बँकेने नेमलेले स्थानिक वकील या बँकेचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज