अ‍ॅपशहर

एनकेजीएसबीच्या नफ्यात वाढ

एनकेजीएसबी बँकेने १० हजार ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय टप्पा पार केला आहे. या बँकेच्या कामकाज नफ्यात १० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

Maharashtra Times 30 Jun 2016, 8:59 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई एनकेजीएसबी बँकेने १० हजार ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय टप्पा पार केला आहे. या बँकेच्या कामकाज नफ्यात १० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे बँकेचा शाखाविस्तारही वाढला असून आता बँकेच्या १०५ शाखा कार्यरत आहेत. बँकेची ९९वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मुंबईत झाली. त्यावेळी वरील माहिती देण्यात आली. बँकेने आपल्या शाखा महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यांत वाढवल्या आहेत. बँकेचा कामकाज नफा ८८ कोटी रुपये झाला असून निव्वळ नफ्यात ५.५४ कोटी रुपये वाढ होऊन तो ४५.६७ कोटी रुपये झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nkgsb bank clocks 45 cr net profit
एनकेजीएसबीच्या नफ्यात वाढ


बँकेचे अध्यक्ष किशोर कुलकर्णी यांनी बँकेच्या वाटचालीचे श्रेय बँकेचे कर्मचारी, भागधारक आणि बँकेचे ग्राहक यांना दिले. २६ सप्टेंबर १९१७ मध्ये स्थापन झालेल्या एनकेजीएसबीला मध्य प्रदेशात व्यवसायविस्तार करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. पुढील वर्ष हे बँकेचे शतक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने अध्यक्षांनी शताब्दी बोधचिन्हाचेही अनावरण केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज