अ‍ॅपशहर

‘दोन हजारांची नोट रद्द करणार नाही’

नोटाबंदीनंतर नव्याने आणलेल्या दोन हजारांची नोट बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

Maharashtra Times 18 Mar 2017, 4:46 am
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर नव्याने आणलेल्या दोन हजारांची नोट बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no plan to withdraw rs 2000 notes jaitley
‘दोन हजारांची नोट रद्द करणार नाही’


नोटाबंदीच्या निर्णयानंतर १० डिसेंबर २०१६पर्यंत बारा लाख ४४ हजार कोटी रुपयांच्या पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये जमा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत ‘बनावट नोटा, हिशेबातील चूक आणि दोनदा मोजल्या गेलेल्या नोटा आदी त्रुटी दूर झाल्यानंतरच नेमका आकडा सांगता येईल,’ असे सांगून जेटली म्हणाले, की तीन मार्च २०१७ रोजी १२ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. २७ जानेवारी रोजी नऊ लाख ९२ हजार १०० कोटी रुपयांच्या नोटा बाजारात होत्या. जीडीपी अधिक वाढलेला आणि खरा असेल, अशी नवी व्यवस्था निर्माण करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटा आणि दहशतवाद्यांना पुरवठा थांबविण्यासाठी सरकारने निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नोटाबंदी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे बँकातील ठेवी वाढल्या. त्यामुळे व्याजदरात कपात झाली आणि बँकांना अधिक कर्जपुरवठा करता यावा यासाठी मदत झाली. नोटाबंदीनंतर विविध प्रकारचे निर्बंध घालण्यात आले होते. हे निर्बंध टप्प्याटप्याने काढून टाकण्यात आले आहेत.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज