अ‍ॅपशहर

नोटाबंदीचा सुधारणात्मक परिणाम

नोटाबंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुधारणात्मक परिणाम दिसून येईल, असे रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

Maharashtra Times 30 Dec 2016, 3:00 am
मुंबई ः नोटाबंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुधारणात्मक परिणाम दिसून येईल, असे रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी गुरुवारी स्पष्ट केले. यामुळे हरळून न जाता, वित्त बाजारातील चढउतारांपासून आर्थिक विकासाचे रक्षण करणेही अगत्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. अर्धवार्षिक आर्थिक स्थिरता अहवालात त्यांनी हे मत मांडले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम note ban
नोटाबंदीचा सुधारणात्मक परिणाम


पटेल म्हणाले, येत्या काळात ५०० व १०००च्या नोटा बाजारातून काढून घेतल्याचा परिणाम होणार आहे. डिजिटल पेमेंटला यामुळे चालना मिळाली असून त्यातून व्यवहारांमध्ये उत्तरदायित्व, पारदर्शकता वाढीस लागली आहे. नोटाबंदीच्या काळात नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी मान्य केले. शुक्रवारी, ३० डिसेंबरपर्यंत सर्व बँका रद्द नोटा स्वीकारतील, असेही डॉ. उर्जित पटेल यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज