अ‍ॅपशहर

आता धनादेशावर आधार नंबर लिहिणे सक्तीचे?

आता सरकार धनादेशावरही आधार नंबर लिहिणे सक्तीचे करणार आहे का? हा प्रश्न विचारण्यामागचे कारण म्हणजे चालू खात्याच्या धनादेशावर आधार नंबर लिहिण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या नव्या पर्यायामुळे व्यापारी वर्गांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2018, 11:14 am
सुधा श्रीमाली; मुंबई: आता सरकार धनादेशावरही आधार नंबर लिहिणे सक्तीचे करणार आहे का? हा प्रश्न विचारण्यामागचे कारण म्हणजे चालू खात्याच्या धनादेशावर आधार नंबर लिहिण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या नव्या पर्यायामुळे व्यापारी वर्गांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम now current accounts cheque has aadhaar detail option
आता धनादेशावर आधार नंबर लिहिणे सक्तीचे?


राज फॅब्रिक्सच्या मालकाला एका पार्टीने नुकताच त्यांचा धनादेश परत पाठवला. या धनादेशावर आधार नंबर लिहिलेला नसल्याने तो वटणार नसल्याचं या पार्टीचं म्हणणं होतं. राज फॅब्रिक्सच्या मालकानं या धनादेशावरील आधार नंबर लिहिण्याचा पर्याय पाहिला तेव्हा ते आश्चर्यचकीतच झाले. 'आता हा पर्याय वैकल्पिक आहे. पण सरकार ज्या पद्धतीने गुपचूप निर्णय घेऊन ते निर्णय सक्तीचे करते, त्याचप्रमाणे हा निर्णयही सक्तीचा केला जाईल. त्यात आश्चर्य वाटायला नको. जर खरेदी करणारा आणि विक्रेता दोघांचेही बँक खात्याचे नंबर आधार आणि पॅन कार्डशी लिंक आहेत. तर मग पुन्हा धनादेशावर आधार नंबर लिहिण्याची गरजच काय? या मागे सरकारचा काय हेतू आहे?,' असा सवाल राज फ्रॅब्रिक्सच्या मालकाने केला.


'दोन्ही पार्ट्यांनी खात्याशी आधार आणि पॅन नंबर लिंक केले आहे तर धनादेशावर आधार नंबर विचारला तर काय फरक पडतो? त्यामुळे एवढं कशाला घाबरायचं? खरे तर काही काळच हा प्रकार सुरू राहिल, एकदा सिस्टिममध्ये हा नंबर गेल्यानंतर धनादेशावर हा नंबर विचारलाही जाणार नाही. त्यामुळे आधार नंबर धनादेशावर लिहिणं सक्तीचं करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असं सिंडिकेट बँकेचे माजी संचालक अनंत पंडित यांचं म्हणणं आहे. तर सरकार व्यापाऱ्यांचं काम कमी करण्याऐवजी वाढवत आहे. आधार नंबर घेणे चुकीचं नाही. पण त्यासाठी व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असं भारत मर्चंट चेंबरचे चंद्रकिशोर पोद्दार यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज