अ‍ॅपशहर

दोषी ब्रोकर्सविरोधात सेबी आक्रमक

नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमध्ये झालेल्या सुमारे ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासाला वेग आला असून भांडवल बाजार नियंत्रक सेबीला दोषी ब्रोकर्सविरोधात आक्रमक होण्याचे आदेश केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी दिले.

Maharashtra Times 30 Apr 2016, 3:00 am
नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड घोटाळ्याच्या तपासाला वेग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nsel scam probe to speed up
दोषी ब्रोकर्सविरोधात सेबी आक्रमक


वृत्तसंस्था, नवी दिल्ली नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमध्ये झालेल्या सुमारे ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासाला वेग आला असून भांडवल बाजार नियंत्रक सेबीला दोषी ब्रोकर्सविरोधात आक्रमक होण्याचे आदेश केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी दिले. त्याचबरोबर या सर्व प्रकरणाची चौकशी सक्तवसुली संचालनालयही करत आहे. ही माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली.

एनएसईएल या वायदे बाजारातील घोटाळा हा अदायगी (पेमेंट) व व्यवहारपूर्ती (सेटलमेंट) यासंदर्भात आहे. २०१३मध्ये उघड झालेल्या या घोटाळ्याचा तपास विविध एजन्सी करत आहेत. त्यामध्ये सेबीसमवेत मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सक्तवसुली संचालनालय यांचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने आतापर्यंत दोषी ब्रोकर्सच्या सुमारे ५ हजार ७५७ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. याशिवाय सामायिक असलेल्या ३२ मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे. यापैकी ७४० कोटी रुपयांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने तर १ हजार २२२.८९ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने टाच आणली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज