अ‍ॅपशहर

सरकारी एजन्सी कांदा आयात करणार

कांद्याचा भाव सातत्याने वाढत असून याची दखल सरकारनेही घेतली आहे.

Maharashtra Times 10 Nov 2017, 3:40 am
नवी दिल्ली : कांद्याचा भाव सातत्याने वाढत असून याची दखल सरकारनेही घेतली आहे. कांद्याचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी एमएमटीसी (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) सारख्या सरकारी एजन्सींना कांदा आयातीची परवानगी सरकारने गुरुवारी दिली. यामुळे बाजारात कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊन भाव आवाक्यात राहतील, असा सरकारचा विश्वास आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम onion procurement
सरकारी एजन्सी कांदा आयात करणार


यासंदर्भात केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव अविनाश के. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यामध्ये वरील निर्णय घेण्यात आला. देशात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश व बिहार ही कांदा उत्पादक राज्ये आहेत. या बैठकीत ‘नाफेड’ला १० हजार टन व स्मॉल फार्मर्स अॅग्रीकल्चर बिझनेस कॉन्सॉर्शियम (एसफॅक) या संस्थेला दोन हजार टन कांदा उत्पादकांकडून खरेदी करण्यास सांगण्यात आले. यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढेल, असा दावा श्रीवास्तव यांनी केला.

एमएमटीसी नेमका किती कांदा आयात करणार याविषयी अद्याप काहीही ठरवण्यात आलेले नाही. कांदा आयातीसाठी एमएमटीसी निविदा काढणार आहे. हा कांदा इजिप्त व चीन येथून आयात केला जाईल, अशी माहिती एक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. सध्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून खासगी व्यापाऱ्यांकरवी कांदा आयात केला जात आहे. याद्वारे आतापर्यंत ११ हजार ४०० टन कांदा आयात करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज