मुंबई : पेटीएम मॉलतर्फे २३ सप्टेंबरपर्यंत ‘कॅशबॅक सेल’ जाहीर केला आहे. त्या अंतर्गत ग्राहकांना ५०१ कोटी रुपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. सेलदरम्यान भेटवस्तू, उपकरणे, मोबाइल आणि फॅशन, कपडे, पादत्राणे आणि सामान यांच्या खरेदीवर १५ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. या व्यतिरिक्त दररोज २५ फोन खरेदीदारांना १०० टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. २०० ग्राहकांना दररोज १०० ग्रॅम पेटीएम गोल्ड प्राप्त होईल, असे पेटीएम मॉलने सांगितले आले आहे.
‘पेटीएम मॉल’तर्फे ‘कॅशबॅक सेल’
पेटीएम मॉलतर्फे २३ सप्टेंबरपर्यंत ‘कॅशबॅक सेल’ जाहीर केला आहे.
Maharashtra Times 22 Sep 2017, 3:00 am