अ‍ॅपशहर

दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात १ रुपया ३४ पैसे, तर डिझेलच्या दरात २ रुपये ३७ पैशांनी वाढ केली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. दिवाळीच्या तोंडावरच महागाईचे फटाके फुटल्यानं त्याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

Maharashtra Times 15 Oct 2016, 8:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम petrol and diesel price hiked again
दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात १ रुपया ३४ पैसे, तर डिझेलच्या दरात २ रुपये ३७ पैशांनी वाढ केली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. दिवाळीच्या तोंडावरच महागाईचे फटाके फुटल्यानं त्याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

यापूर्वी ४ ऑक्टोबरला वितरकांचे कमिशन वाढवण्यासाठी पेट्रोलच्या दरात १४ पैसे आणि डिझेलच्या दरात १० पैशांनी वाढ करण्यात आली होती. दरम्यान, तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्या महिन्याच्या १ ते १६ तारखेदरम्यान तेलाच्या किंमती आणि विदेशी दराच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज