मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचा भाव जैसे थे ठेवला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असली तरी कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवण्याला प्राथमिकता दिली. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे.
गुंतवणूकदारांची उत्सुकता शिगेला ; थोड्याच वेळात 'पेटीएम'चा भांडवली बाजारात प्रवेश, बंपर लिस्टिंगची अपेक्षामुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये आहे.
गो फॅशनचा आयपीओ खुला ; गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या तपशील
दिवाळीपूर्वी कंपन्यांनी केलेल्या दरवाढीने पेट्रोल आणि डिझेल दर उच्चांकी पातळीवर गेले होते. २७ दिवस झालेल्या सलग दरवाढीने पेट्रोल ८.१५ रुपयांनी महागले होते. ३० दिवस झालेल्या दरवाढीने डिझेलचा भाव ९.४५ रुपयांनी वाढला होता.
सोने महागले ; जाणून घ्या आजचा सोने आणि चांदीचा भावदरम्यान कच्च्या तेलाचा भावात घसरण कायम आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव १.४६ डाॅलरने कमी झाला आणि प्रती बॅरल ८१. ०५ डॉलर इतका झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव २.४० डाॅलरने कमी झाला आणि तो ७८.७६ डॉलर प्रती बॅरल झाला. इंधन मागणी वाढत असल्याने पेट्रोलियम कंपन्यांसाठी जादा आयात करावी लागत आहे.