मुंबई : इंधन दरवाढीवर टीकेचे धनी बनलेल्या पेट्रोलियम कंपन्यांनी तूर्त इंधन दर स्थिर ठेवले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ७० डॉलरवर गेला आहे. मात्र तरीही कंपन्यांनी इंधन दर जैसे थेच ठेवले आहेत.
सोनं झालंय स्वस्त ; मागील नऊ महिन्यात सोन्याच्या किंमतीत २१ टक्के घसरण, हा आहे आजचा भाव
पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. आज सोमवारी मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर कायम आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८८.६० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१७ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे. सलग आठव्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत.
गृहिणींसाठी गुंतवणुकीचे पर्याय; या गोष्टींनी महिला होतील आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी
कोलकात्यात आज पेट्रोल ९१.३५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.३५ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.२२ रुपये असून डिझेल ८६.३७ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.७६ रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९९.२१ रुपयांवर स्थिर आहे.
कॉर्पोरेट्सची बांधिलकी; 'या' कंपन्या उचलणार कर्मचारी आणि कुटुंबियांच्या लसीकरणाचा आर्थिक भार
जागतिक कमॉडिटी बाजारात मागील चार दिवसात कच्च्या तेलाचा भाव सहा डॉलरने वधारला आहे. सोमवारी सिंगापूरमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.२५ डॉलरची वाढ झाली आणि प्रती बॅरल भाव ६७.३४ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडने सुमारे वर्षभरानंतर ७० डॉलरची पातळी ओलांडली आहे. आज ब्रेंट क्रूडचा भाव १.२७ डॉलरने वधारला आणि ७०.६३ डॉलर झाला.
फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलची १६ वेळा वाढ झाली. या दरवाढीने पेट्रोल ४.७४ रुपयांनी महागले तर डिझेल ४.५२ रुपयांनी महागले आहे. नुकताच सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली होती. गॅस सिलिंडरचा भाव ८०० रुपयांवर गेला. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १२५ रुपयांची वाढ झाली आहे.